ओमिक्रॉन : कॉर्डिलिया क्रूझवरचे एकूण 139 जण कोव्हिड पॉझिटिव्ह

Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

कॉर्डिलिया क्रूझवरचे एकूण 139 कोव्हिड पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलंय. 4 जानेवारीला ही क्रूझ मुंबईला परतल्यावर क्रूझवरच्या सर्वांची कोव्हिड चाचणी करण्यात आली होती.

आर्यन खानच्या अटकेनंतर वादात सापडलेले कॉर्डेलिया क्रूझ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळचं कारण या क्रूझवर झालेला कोरोनाचा संसर्ग हे आहे.

या क्रुझमधील 60 हून अधिक प्रवासी करोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली होती. हे क्रूझ मुंबईहून गोव्याला जात होतं. यापैकी काही प्रवाशी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांना गोव्यात उतरण्यास मनाई करण्यात आली होती.

त्यानंतर ही क्रूझ पुन्हा मुंबईमध्ये परतली आणि ग्रीन गेट इथे ती होती. क्रूझवरच्या 1,827 जणांची कोव्हिड चाचणी करण्यात आली. त्यामध्ये एकूण 139 जण पॉझिटिव्ह आढळले.

कॉर्डिलिया बोटीवरील कोरोना बाधित 60 प्रवाशांना रिचर्डसन आणि क्रुडास जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये दाखल करण्यात येईल किंवा त्यांच्या इच्छेनुसार सुशल्‍क हॉटेल कोव्हिड केंद्रात दाखल करण्यात येईल. त्यांच्या वाहतुकीसाठी 17 आसनी 5 रुग्‍णवाहिका तैनात केल्या आहेत. बाधित (पॉझिटिव्ह) रुग्णांना रीचर्डसन आणि क्रूडास येथील जम्बो कोव्हिड केंद्रात दाखल केले जाईल किंवा त्‍यांच्‍या इच्छेनुसार सशुल्क हॉटेल कोव्हिड केंद्रात दाखल होता येईल. ज्यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे त्यांना 7 दिवस गृह अलगीकरणात रहावे लागेल. ग्रीन गेट येथे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून पोलीस प्रशासनाने पुरेसा बंदोबस्त तैनात केला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)