You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लस : कोव्होवॅक्स लशीला WHO नं दिली मान्यता
जागतिक आरोग्य संघटनेनं कोव्हिड-19 च्या नव्या कोव्होव्हॅक्स या लशीला मान्यता दिली आहे. त्यामुळं आता कोव्हिडसाठी मान्यता असलेल्या लशींचा आकडा नऊ झाला आहे.
या लशीचं नाव कोव्होव्हॅक्स टीएम एमस आहे. भारताच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं ही लस तयार केली आहे. कोव्होव्हॅक्सला मान्यता दिल्यानं कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये अधिकाधिक लोकांची लशीची गरज भागवता येणार आहे.
"याचा उद्देश विशेषतः कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये लशीचा पुरवठा पोहोचवणं हा आहे. आतापर्यंत अशा 41 देशांनी 10 टक्क्यांपेक्षाही कमी लसीकरण केलं आहे. तर इतर 98 देशांमध्ये लसीकरणाचं प्रमाण 40 टक्केही झालेलं नाही," असं WHO चे उपमहासंचालक डॉ. मारियांजेला सिमो म्हणाले.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांना WHO कडून मान्यता मिळाल्याने आनंद व्यक्त करत ट्विट केलं आहे.
"कोव्हिड-19 च्या विरोधात आमच्या लढ्यातील आणखी एक मैलाचा दगड. कोव्होव्हॅक्सच्या आपत्कालीन वापराला मंजुरी मिळाली आहे," अशी पोस्ट त्यांनी केली.
सीरम इन्स्टिट्यूटने उत्पादन आणि पुरवण्यासाठी अमेरिकेच्या बायोटेक कंपनीशी हातमिळवणी केली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)