केंद्रीय गृह राज्य मंत्री अजय मिश्रांचा पत्रकाराला धमकी देतानाचा व्हीडिओ व्हायरल

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

केंद्रीय गृह राज्य मंत्री अजय मिश्रा बुधवारी आणखी एका वादात सापडले. उत्तर प्रदेशातल्या लखीमपूर खिरीमध्ये पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर अजय मिश्रा संतापल्याचं एका व्हिडिओत दिसतंय.

मिश्रांनी आपल्या पत्रकारासोबत वाईट वर्तन केल्याचा दावा एबीपी न्यूज चॅनलने म्हटलं आहे.

या व्हीडिओ क्लिपमध्ये मिश्रा पत्रकारांना धमकावताना दिसतात. लखीमपूर खिरीमध्ये शेतकऱ्यांना चिरडण्याच्या प्रकरणामध्ये त्यांचा मुलगा आशिष मिश्रांच्या भूमिकेबद्दल SIT ने दिलेल्या अहवालाविषयी एका पत्रकाराने मिश्रांना सवाल केला.

एका ऑक्सिजन प्लांटचं उद्घाटन करण्यासाठी मिश्रा शहरात आले होते. त्याचवेळी पत्रकाराने प्रश्न विचारल्यानंतर मिश्रा म्हणाले, "दिमाग खराब है क्या बे," (तुझं डोकं फिरलंय का)

या व्हिडिओत मिश्रा त्या पत्रकाराशी झटापट करताना आणि त्याला माईक बंद करण्यास सांगताना दिसतात.

व्हिडिओ अनेक ठिकाणी ते या पत्रकाराविषयी आक्षेपार्ह भाषेत बोलताना दिसतात. मिश्रांना पदावरून हटवावं अशी मागणी विरोधी पक्ष करत आहे.

3 ऑक्टोबरला लखीमपूर खिरीमध्ये शेतकऱ्यांवर पूर्वनियोजित कटानुसार गाडी घालण्यात आल्याचं SITच्या अहवालात म्हटलंय.

अजय मिश्रांचा मुलगा आशिष मिश्रानेच शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याचं म्हटलं जातंय. शेतकऱ्यांना मारण्याच्याच हेतूने त्यांच्या अंगावरून गाड्या नेण्यात आल्याचं SIT च्या अहवालात म्हटलं आहे.

कॅबिनेटने मिश्रांचा राजीनामा घ्यावा, असं काँग्रेस नेते राहुल गांधींनी म्हटलंय. SITच्या अहवालावर संसदेत चर्चा व्हावी अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी केलीय. आशिष मिश्रांवर हत्या, अहेतुक हत्या आणि खुनाच्या कटासोबतच इतर गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)