सोनिया गांधीनी हरकत घेतल्यावर सीबीएसईने हटवला 'तो' प्रश्न

सोनिया गांधी

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

13 डिसेंबर 2021 सोमवारी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसईने दहावीच्या इंग्रजीच्या परीक्षेत विचारलेल्या प्रश्नाचा मुद्दा उपस्थित केला.

"हा प्रश्न महिलाविरोधी असून शिक्षण मंत्रालयाने या पूर्ण प्रकरणाची चौकशी केली पाहिजे आणि अशी घटना पुन्हा होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असंही सोनिया गांधी यांनी लोकसभेत सांगितलं. हा प्रश्न माघारी घेऊन शिक्षण मंत्रालयाने माफी मागावी," असंही त्या म्हणाल्या.

यानंतर सीबीएसईने एक पत्रक प्रसिद्ध केलं. इंग्रजी भाषा आणि साहित्याच्या पेपरमध्ये असलेला एक परिच्छेद बोर्डाच्या मार्गदर्शक सूचनांरुप नव्हता असं त्यात लिहिलं आहे.

"आम्हाला याबाबत जो फीडबॅक दिला होता, त्यातले मुद्दे तज्ज्ञांच्या समितीसमोर ठेवले आहेत," असं त्यात लिहिलं आहे.

या पत्रकात पुढे म्हटलं, "आहे की त्यांच्या शिफारशीनंतर परिच्छेद क्र 1 आणि त्याच्यासंबंधी प्रश्नाला हटविण्यात येत आहे. या परिच्छेदाचे सर्व गुण विद्यार्थ्यांना मिळतील."

तसेच यात समानता यावी प्रत्येक सेटमधील परिच्छेद क्र. 1मधील प्रश्नांचे पूर्ण गुण विद्यार्थ्यांना मिळतील.

11 डिसेंबर 2021 रोजी इंग्रजी भाषा आणि साहित्य विषयाची परीक्षा झाली होती. या प्रश्नपत्रिकेमध्ये असलेल्या काही ओळींबद्दल हरकत घेण्यात आली होती आणि त्या महिलाविरोधी असल्याचं सांगण्यात आलं.

हाच मुद्दा सोनिया गांधी यांनी शून्यप्रहरात उपस्थित केला. त्या म्हणाल्या, "मी सरकारचं लक्ष 11 डिसेंबर रोजी दहावीच्या परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्नाकडे वेधू इच्छिते. यातील एक परिच्छेद प्रतिगामी विचारांचे प्रदर्शन करतो. याला देशभरात विरोध होत आहे."

सीबीएसई

फोटो स्रोत, CBSE

त्या म्हणाल्या, "या परिच्छेदात घाणेरडे वक्तव्य आहे. उदाहरण म्हणून मी एक वाक्य सांगते. महिलांना मिळालेलं स्वातंत्र्य अनेक सामाजिक आणि कौटुंबिक समस्यांचं मुख्य कारण आहे'."

यानंतर लोकसभेत शेम शेमच्या घोषणा ऐकू आल्या.

त्यानंतर सोनिया गांधी आणखी एक उदाहरण दिलं. त्यात महिला आपल्या नवऱ्याचं ऐकत नाहीत त्यामुळे मुले आणि नोकर बेशिस्त होतात असं लिहिलेलं होतं.

हा पूर्ण परिच्छेद निंदनीय विचारांनी भरलेला असून त्यात विचारलेले प्रश्न संवेदनहीन आहेत असं सोनिया गांधी म्हणाल्या.

शिक्षण मंत्रालयाने अभ्यासक्रम आणि परिक्षेत जेंडर सेन्सिटिव्हिटीच्या मापदंडांचा विचार केला पाहिजे असं त्यांनी सांगितलं.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

दहावीच्या परीक्षेत विचारलेल्य़ा प्रश्नांवर ट्वीटरवरही लोकांनी प्रतिक्रिया दिल्या असून त्यांनी यावर टीका केली आहे.

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही ट्वीट करुन विचारलं होतं, "अविश्वसनीय, काय आपण खरंच मुलांना हे निरर्थक शिकवत आहोत? भाजपा सरकार सरळसरळ महिलांबाबतीत अशा प्रतिगामी विचारांचं समर्थनं करत असल्याचं दिसत आहे."

हाच मुद्दा काँग्रेस, द्रमुक, आयूएमएल, राष्ट्रवादी काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्सने उपस्थित केला आणि हे महिलाविरोधी असल्याचं सांगत सभात्याग केला.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)