Omicron: देशात ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या एका दिवसांत 4 वरुन 21 वर

कोरोना, ओमिक्रॉन, दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कोरोना ओमिक्रॉन व्हेरिएंट
Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

नवी दिल्लीमध्ये कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन या व्हेरिएंटचा पहिला रुग्ण आढळला आहे. देशात ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या 21 झाली आहे.

रविवारी महाराष्ट्रात 7, राजस्थानमध्ये 9 आणि दिल्लीमध्ये ओमिक्रॉनचा एक रुग्ण आढळला.

टांझानियाहून दिल्लीला. आलेल्या व्यक्तीला ओमिक्रॉनची लागण झाल्याचं समोर आलं असून उपचारासाठी त्यांना LNJP रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

ओमिक्रॉनच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर परदेशातून प्रवास करुन येणाऱ्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. त्यापैकी 17 जण आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी पत्रकारांबरोबर बोलताना ही माहिती दिली आहे.

कर्नाटकमध्ये 2 रुग्ण

कर्नाटकमध्येही ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळले होते.

त्याशिवाय गुजरातच्या जामनगरमध्ये एक आणि महाराष्ट्रातील डोंबिवलीमध्ये प्रत्येकी एक कोरोना रुग्ण आढळून आला आहे.

दिल्लीमध्ये विदेशातून येणाऱ्या रुग्णांमुळं ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेता विमान वाहतूक बंद करण्याची विनंती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केली होती.

मात्र, अद्याप विमान वाहतूक सुरू असून परदेशातून येणाऱ्यांची कोरोना चाचणी करून त्यांचं विलगीकरण याद्वारे सरकारतर्फे खबरदारी घेतली जात आहे.

महाराष्ट्रात शनिवारी आढळला पहिला रुग्ण

महाराष्ट्रातही शनिवारी ओमिक्रॉनचा हिला रुग्ण आढळला आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात हा रुग्ण राहत असून, तो दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरातून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईत आला आहे.

24 नोव्हेंबर 2021 रोजी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईमध्ये आलेल्या 33 वर्षीय तरुणामध्ये ओमिक्रॉन हा व्हेरियंट सापडला.

कोरोना, ओमिक्रॉन, दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र

फोटो स्रोत, PA Media

फोटो कॅप्शन, कोरोना ओमिक्रान व्हेरिएंटचे रुग्ण जगभरात अनेक ठिकाणी आढळून येत आहेत.

हा तरुण कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी असून त्याने कोणतीही कोव्हिड प्रतिबंधक लस घेतलेली नाही. 24 नोव्हेंबर 2021 रोजी या प्रवाशाला सौम्य ताप आला. मात्र त्याला इतर कोणतीही लक्षणे आढळली नाहीत.

या रुग्णाचा आजार एकूण सौम्य स्वरूपाचा असून तो सध्या कल्याण डोंबिवली येथील कोव्हिड केअर सेंटर मध्ये उपचार घेत आहे, अशी माहिती आरोग्य खात्याकडून देण्यात आलीय.

महाराष्ट्र सरकारने परदेशातून आलेल्या प्रवाशांची कोरोना तपासणी करण्याचा निर्णय घेतलाय. 1 डिसेंबरपासून मुंबईत आलेल्या प्रवाशांची तपासणी सुरू करण्यात आलीये.

लसीकरण 50 टक्के?

दरम्यान, देशातील लसीकरणासाठी पात्र असलेल्या लोकसंख्येपैकी 50 टक्के लोकसंख्येचं पूर्णपणे लसीकरण झालं असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी दिली आहे.

यासाठी मांडवीय यांनी ट्विट करून देशवासियांचं अभिनंदन केलं आहे. देशातील लसीकरणासाठी पात्र लोकसंख्येपैकी 50 टक्के नागरिकांचं लसीकरण झालं आहे. आपण कोरोना विरोधातील हा लढा नक्की जिंकू असं मांडवीय म्हणाले आहेत.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)