विनोद दुआ यांचं निधन

फोटो स्रोत, facebook
ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचं प्रदीर्घ आजारामुळे निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. या वर्षाच्या सुरुवातीला कोरोना झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
गुरुग्राम इथल्या मेदांता हॉस्पिटलमधल्या अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. विनोद यांच्या पश्चात दोन मुली आहेत. त्य़ापैकी बकुळ दुआ क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आहेत तर मल्लिका दुआ कॉमेडिअन आहेत.
हिंदी टीव्ही पत्रकारितेचे मानकरी म्हणून दुआ यांचं मोलाचं योगदान होतं. दूरदर्शन, एनडीटीव्ही तसंच वायर संस्थांसाठी दुआ यांनी काम केलं.
"निर्भय आणि अतुलनीय आमच्या वडिलांचं निधन झालं आहे. ते विलक्षण आयुष्य जगले. दिल्लीतल्या रेफ्युजी कॉलनीतून बाहेर पडत त्यांनी पत्रकारितेच्या शिखरापर्यंत वाटचाल केली. त्यांची पत्रकारिता कारकीर्द 42 वर्षांची होती. त्यांनी आपल्या कामातून सातत्याने सत्य मांडलं", असं मल्लिका दुआ अर्थात विनोद दुआ यांच्या कन्या यांनी म्हटलं आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी विनोद आणि त्यांच्या पत्नी पद्मावती दुआ यांना कोरोनाची लागण झाली होती. पद्मावती या चिन्ना दुआ नावाने प्रसिद्ध आहेत. दुर्देवाने पद्मावती यांची कोरोनाविरुद्धची लढाई 11 जून रोजी थांबली.
कोरोनामुळे रुग्णालयात दाखल केल्यानंतर विनोद यांची प्रकृती ढासळतच गेली. रविवारी लोधी स्मशानभूमीत विनोद यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत अशी माहिती मल्लिका यांनी दिली आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)























