'...आता मथुरेची तयारी आहे', केशव प्रसाद मौर्यांच्या ट्वीटवरून नवा वाद

केशव प्रसाद मौर्य

फोटो स्रोत, Ani

फोटो कॅप्शन, केशव प्रसाद मौर्य
Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी बुधवारी (1 डिसेंबर) म्हटलं की, "आता मथुरेची तयारी आहे."

मौर्य यांच्या या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण आलं आहे.

अनेक संघटना सद्यस्थितीत श्रीकृष्ण जन्मस्थळाविषयी आंदोलन चालवण्याची घोषणा करत आहेत.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

6 डिसेंबरच्या दिवशी बाबरी मशिदीचा विध्वंस झाला होता. याच दिवशी अनेक संघटनांनी मथुरेत कार्यक्रमांची घोषणा केली आहे.

उत्तर प्रदेश पोलिसांनी कार्यक्रमांना परवानगी दिलेली नाहीये. पण, अशातच मौर्य यांच्या वक्तव्यामुळे इथलं वातावरण तापलं आहे.

विरोधी पक्षांनी मौर्य यांच्या वक्तव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत आणि त्यांच्या वक्तव्याचा येणाऱ्या निवडणुकांशी संबंध लावला जात आहे.

"अयोध्या, काशी इथं भव्य मंदिराचं काम सुरू आहे. मथुरेची तयारी आहे," असं मौर्य यांनी सोमवारी ट्वीट केलं.

मथुरा

फोटो स्रोत, SURESH SAINI/BBC

मौर्य यांचं वक्तव्य त्याच वेळी आलंय, जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 13 डिसेंबर रोजी काशी विश्वनाथ कॉरिडोरचं उद्घाटन करणार आहेत. 2019मध्ये या कॉरिडोरचं काम सुरू झालं होतं.

यादरम्यान, बुधवारीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्येला पोहोचले होते.

योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं की, राम आमचे पूर्वज आहेत. उपासना विधी बदलल्यानं पूर्वज बदलत नाहीत.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

आदित्यनाथ यांनी म्हटलं, "अयोध्येनं 500 हून अधिक वर्ष मोठा संघर्ष पाहिला आहे. वेळोवेळी हल्ले होत राहिले, पण अयोध्या कधीच चूप राहिली नाही. आम्ही अन्याय, अत्याचार खपवून घेत नाहीत. हीच अयोध्या आहे.

"प्रभू रामचंद्रानं ना कधी अन्याय केला, ना तो सहन केला. अर्थात आम्ही अधर्म करणार नाही आणि तो सहनही करणार नाही. अयोध्या सूर्यवंशाची राजधानी आहे."

विरोधकांचे प्रश्न

भाजप नेत्यांच्या वक्तव्यावर विरोधी नेत्यांनी टीकास्त्र सोडलं आहे.

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यांनी म्हटलं, "गरिबांना लुटायचं आणि श्रीमंतांचा खिसा भरायचा, हाच भाजपचा अजेंडा आहे. भाजप नेहमीच श्रीमंतांच्या भल्यासाठी काम करत आलं आहे. पण, येणाऱ्या निवडणुकीत रथ यात्रा किंवा इतर कोणताही नवा मंत्र कामात येणार नाही."

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

काँग्रेसच्या नेत्यांनीही मौर्य यांच्या वक्तव्यानंतर प्रश्न उपस्थित केले आहेत.

मथुरेला श्रीकृष्णाची जन्मभूमी म्हणून मान्यता आहे. श्रीकृष्ण जन्मस्थानाची 13.37 एकर जमिनीवरील मालकी हक्कासाठी अनेक जण न्यायालयातही गेले आहेत. या जमिनीवरील काही भागात शाही ईदगाह आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)