Covaxin लशीला WHOनं कोव्हॅक्स कार्यक्रमातून वगळलं

कोव्हॅक्सिन

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्युएचओ) भारताच्या 'कोव्हॅक्सिन' या एकमेव स्वदेशी कोरोना प्रतिबंधक लसीला आपल्या 'कोव्हॅक्स' कार्यक्रमातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत जगभरातील विकसनशील देशांना कोरोना लसींचा पुरवठा केला जातो. 'डब्ल्युएचओ'ने शनिवारी ही कारवाई केल्यानंतर हैदराबाद स्थित भारत बायोटकेने आपली लस सुरक्षित व परिणामकारक असल्याचा पुनरुच्चार केला आहे. तसंच ही लस घेतल्याचं प्रमाणत्रही वैध असल्याचे स्पष्ट केले आहे.

"कंपनीने कोव्हॅक्सिनच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड केली नाही. कोव्हॅक्सिन कोरोनापासून बचाव करण्यासाठी एक महत्वपूर्ण लस आहे. ही लस तयार करण्यासाठी कठोर मापदंड स्विकारले होते. यापुढे जागतिक मागणीनुसार सुधारणा व विकासाची प्रक्रिया राबवण्यात येईल", असं कंपनीने म्हटलं आहे.

कोव्हिड-19 विरोधी 'कोव्हॅक्सिन'ला जागतिक आरोग्य संघटनेनी (WHO) आपातकालीन वापरासाठी मंजुरी दिली होती.

याआधी केवळ कोव्हिशिल्ड लशीलाच WHO ने परवानगी दिली होती. त्यामुळे कोव्हॅक्सिन घेतलेल्या लोकांना भारताबाहेर जाताना अडचण निर्माण होऊ लागली होती.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

जागतिक आरोग्य संघटनेनी मान्यता दिलेल्या लशींच्या यादीत कोव्हॅक्सिनचा समावेश करण्यात आला आहे. कोव्हॅक्सिनने सर्व निकष पूर्ण केले आहेत असं जागतिक आरोग्य संघटनेनी ट्वीट करून म्हटले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांच्या समितीने म्हटले आहे की या लशीचे दोन डोस घ्यावे लागतील. दोन्ही डोसमध्ये 4 आठवड्यांचे अंतर हवे आणि 18 वर्षांपुढील लोकांना ही लस देण्यात यावी असे देखील त्यांनी सुचवले आहे.

कोव्हॅक्सिन लस नेमकी काय आहे?

कोव्हॅक्सिन एक इनअॅक्टिव्हेटेड व्हॅक्सिन आहे म्हणजे यात मृत कोरोना व्हायरस वापरला आहे. ही लस शरीरात गेली तर कोरोना व्हायरसला संपवू शकते पण त्याने काही धोका होत नाही.

कोव्हॅक्सिन लस

फोटो स्रोत, Getty Images

ही लस भारत बायोटेकने बनवली आहे. भारत बायोटेकला गेल्या 24 वर्षांचा अनुभव आहे. या काळात त्यांनी 16 लशी बनवल्या आहेत आणि 123 देशांमध्ये निर्यात केल्या आहेत.

भारत बायोटेकने ही लस बनवताना भारताच्या राष्ट्रीय विषाणुविज्ञान संस्थेने अलग केलेल्या कोरोना व्हायरसचं सँपल वापरलं होतं.

ही लस दिल्यानंतर शरीरातल्या रोगप्रतिकारक शक्ती मेलेल्या कोरोना व्हायरसची रचना ओळखू शकते. याने रोगप्रतिकारक शक्तीला कोरोना व्हायरसच कसा आहे हे समजतं ज्यायोगे त्याच्याशी लढता येतं.

या लशीचे दोन डोस चार आठवड्यांच्या अंतराने घ्यावे लागतात. ही लस 2 ते 8 डिग्री सेल्सियसला साठवता येते.

जानेवारी महिन्यात या लशीला तडकाफडकी मान्यता दिली होती ज्यामुळे अनेक तज्ज्ञांच्या भुवया उंचावल्या होत्या.

SARS - CoV2 च्या B.1.617.2 म्हणजेच डेल्टा व्हेरियंटवर कोव्हॅक्सिन लस 65.2% परिणामकारक आढळली असल्याचं भारत बायोटेकने जाहीर केलेल्या 'प्री - प्रिंट डेटा'मध्ये म्हटलं होतं.

कोव्हॅक्सिन वादात का सापडली होती?

जानेवारी महिन्यात या लशीला 'आणिबाणीच्या परिस्थितीत' मान्यता दिली होती. नियमकांनी म्हटलं होतं की, 'आणिबाणीच्या परिस्थितीत, विशेषतः व्हायरसचे नवनवीन म्युटेशन होत असताना, लोकांच्या हितासाठी या लशीच्या चाचण्या चालू असतानाही लशीच्या वापराला मान्यता देत आहोत.'

कोव्हॅक्सिन लस

फोटो स्रोत, EPA

पण लाखो लोकांना जी लस प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दिली जाणार आहे ती 'आणिबाणीचा उपचार' कसा ठरू शकते याबद्दल तज्ज्ञांनी प्रश्न उभे केले. ऑल इंडिया ड्रग अॅक्शन नेटवर्कने त्यावेळी म्हटलं होतं की " ज्या पूर्ण अभ्यास झालेला नाही अशा लशीला मान्यता देण्यामागे कोणतं वैज्ञानिक कारण असू शकतं याचा विचार करून आम्हीच गोंधळात पडलो आहोत. याचा पूर्ण डेटा हातात आलेला नसणं हे नक्कीच काळजीचं कारण आहे. "

पण निर्माते आणि नियमक दोघांनीही कोव्हॅक्सिनची पाठराखण केली आणि म्हटलं की, "ही लस सुरक्षित आहे आणि कणखर असा इम्यून रिस्पॉन्स देते."

भारत बायोटेकने म्हटलं की भारताच्या क्लीनिकल चाचण्यांच्या कायद्यांनी या लशीला 'लवकरात लवकर' मंजूरी मिळण्याचा रस्ता सोपा केला. या लशीच्या चाचण्यांच्या दुसऱ्या फेरीनंतर 'या जीवघेण्या रोगाची गंभीरता लक्षात घेऊन असं करण्यात आलं."

फेब्रुवारी महिन्यात या लशीचा डेटा जाहीर करण्यात येईल असंही त्यांनी म्हटलं होतं. त्याप्रमाणे त्यांनी डेटा जाहीर केला होता.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)