Covaxin : 2 ते 18 वर्षे वयोगटासाठी कोव्हॅक्सिन लस देण्याची CDSCOला शिफारस

फोटो स्रोत, Getty Images
भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस दोन ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना देण्यासाठी सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) ला शिफारस करण्यात आली आहे. पीटीआय वृत्तसंस्थेनं सूत्रांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलंय.
यानंतर भारत बायोटेकनं या वृत्ताला दुजोरा देत माहिती दिली की, भारत बायोटेकने दोन ते 18 वर्षे वयोगटातील मुलांची कोव्हॅक्सिन (BBV152) वैद्यकीय चाचणी घेतली होती.
या चाचणीतले नमुने भारत बायोटेकने CDSCO कडे सोपवले होते. त्यानंतर भारत सरकारच्या सब्जेक्ट कमिटीने (SEC) या नमुन्यांसदर्भात सकारात्मक शिफारस केली, अशी माहिती भारत बायोटेकने दिलीय.
दोन ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोरोनावरील लशीला परवानगी मिळवलेली कोव्हॅक्सिन जगातील पहिली लस असल्याचा दावा भारत बायोटेकनं केलाय. यासाठी भारत बायोटेकनं DCGI चे आभारही मानले आहेत.

फोटो स्रोत, Twitter
सब्जेक्ट एक्स्पर्ट कमिटी आणि CDSCO च्या वेगवान प्रक्रियेचं कौतुक भारत बायोटेकनं केलंय.
"आता आम्ही CDSCO च्या उर्वरित परवानगीची वाट पाहत आहोत, जेणेकरून दोन ते 18 वर्षे वयोगटासाठीची लस लवकरच बाजारात उपलब्ध करून देत येईल," असंही भारत बायोटेकनं म्हटलंय.
झायडस कॅडिला लशीला परवानगी
भारत जगातील सर्वाधिक किशोरवयीन मुलांची लोकसंख्या असलेला देश मानला जातो. युनिसेफच्या आकडेवारीनुसार ही संख्या 25 कोटी 30 लाखांच्या जवळपास आहे.

फोटो स्रोत, Getty Images
नॅशनल सिरोलॉजिकल सर्व्हेच्या ताज्या आकडेवारीनुसार, कोरोनाच्या साथीला सुरुवात झाल्यापासून 60 टक्के मुलं कोरोना विषाणूच्या संपर्कात आली. तसंच, तरुण मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती तयार होण्यची शक्यताही वर्तवण्यात आली.
ऑगस्टमध्ये भारतात झायडस कॅडिला लशीला परवानगी देण्यात आली. ही लस 12 वर्षांवरील मुलांनाही देता येणार आहे. तसंच, झायडस कॅडिलाचे तीन डोस असून, ते इंजेक्शन न देता देता येईल.
ऑक्टोबर महिन्यापासून भारतात 12 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होईल, असं भारत सरकारच्या आरोग्य सल्लागारांनी सांगितलंय. मात्र, या मोहिमेचं रुपांतर व्यापक प्रमाणात व्हायला अजून अवधी जाईल. कारण 18 वर्षांवरील व्यक्तींचं लसीकरणच अजून बाकी आहे. वर्षअखेरपर्यंत ते पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आलीय.
दरम्यान, भारतात कोव्हिशील्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुतनिक या तीन लशींना मान्यता देण्यात आली आहे.
युकेमध्ये ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनकाने विकसित केलेली लस भारतामध्ये सीरम इन्स्टिट्यूट कोव्हिशील्ड नावाने तयार करतेय. तर कोव्हॅक्सिन ही भारत बायोटेक कंपनी आणि इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च - ICMR ने विकसित केलेली संपूर्णपणे भारतीय लस आहे, तर स्पुतनिक लस रशियात निर्मिती झालेली आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)























