IPL 2022: आयपीएलमध्ये खेळणारे जम्मू काश्मीरचे खेळाडू तुम्हाला माहिती आहेत का?

आयपीएल, काश्मीर

फोटो स्रोत, Sunrisers Hyderabad

फोटो कॅप्शन, उम्रान मलिक
Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

उम्रान मलिकने सनरायझर्स हैदराबादसाठी रविवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पदार्पण केलं.

रविवारी 21 वर्षीय उम्रानने पदार्पण करताना टाकलेल्या पहिल्या ओव्हरमध्ये 145, 143, 150, 147, 142, 144 ताशी किलोमीटर वेगाने गोलंदाजी केली. या स्पर्धेत भारतीय गोलंदाजांनी टाकलेला हा सगळ्यांत वेगवान चेंडू आहे.

स्पर्धेत सगळ्यांत वेगवान चेंडू टाकण्याचा मान लॉकी फर्ग्युसनच्या नावावर आहे. या यादीत उम्रान आता (151.3) सातव्या स्थानी आहे.

कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने डावखुरा वेगवान गोलंदाज टी.नटराजनऐवजी शॉर्ट टर्म रिप्लेसमेंट म्हणून नेट बॉलर उम्रान मलिकची निवड झाली होती.

बाद फेरीसाठी पात्र होण्याचा मार्ग बंद झाल्याने सनरायझर्स हैदराबाद उर्वरित सामन्यांमध्ये प्रयोग करत आहेत.

21वर्षीय उम्रान मलिक लिस्ट ए आणि ट्वेन्टी-20 प्रकारात एकेक सामना खेळला आहे.

परवेझ रसूल

आयपीएल स्पर्धेत खेळणारा परवेझ रसूल हा जम्मू काश्मीरचा पहिला खेळाडू ठरला होता. अष्टपैलू रसूलला सनरायझर्स हैदराबादने .. खर्चून ताफ्यात समाविष्ट केलं होतं.

2013 ते 2016 अशा चार हंगामात रसूलला हैदराबादकडून 11 सामने खेळण्याची संधी मिळाली. त्याच्या नावावर 4 विकेट्स आहेत.

रसूलची भारतासाठी एक वनडे आणि एक ट्वेन्टी20 सामना खेळला आहे.

आयपीएल, काश्मीर

फोटो स्रोत, Hindustan Times

फोटो कॅप्शन, परवेझ रसूल

जम्मू काश्मीरसाठी खेळताना रसूलच्या नावावर 4807 धावा असून, 12 शतकं आणि 20 अर्धशतकांचा समावेश आहे. ऑफब्रेक गोलंदाजी करताना रसूलच्या नावावर 266 विकेट्स आहेत.

2013-14 हंगामातील शानदार कामगिरीसाठी रसूलला लाला अमरनाथ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

अब्दुल समद

आक्रमक फटकेबाजीसाठी प्रसिद्ध अब्दुल समद सनरायझर्स हैदराबादसाठी खेळतो. 2020मध्ये हैदराबादने समदला .. रुपये खर्चून ताफ्यात समाविष्ट केलं.

2020 हंगामात समदने 20 सामन्यांमध्ये 170.76च्या स्ट्राईकरेटने 111 धावा केल्या. यंदाच्या हंगामातही समदला अनेक सामन्यांमध्ये खेळण्याची संधी हैदराबाद व्यवस्थापनाने दिली आहे.

जम्मू काश्मीरसाठी खेळताना समदच्या नावावर 10 सामन्यांमध्ये 592 धावा असून, यामध्ये 2 शतकं आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे.

रसीख सलाम

वेगवान गोलंदाज असलेल्या रसीख सलामला मुंबई इंडियन्स संघाने ताफ्यात दाखल केलं. काश्मीरच्या दक्षिणेकडील कुलगाम जिल्ह्यातील आशुमजी हे रसीखचं गाव. 20 लाख रुपये खर्चून मुंबई इंडियन्सने रसीखला समाविष्ट केलं.

17वर्ष आणि 353व्या दिवशी रसीखने मुंबई इंडियन्स संघासाठी पदार्पण केलं. आयपीएल स्पर्धेत सगळ्यात लहान वयात पदार्पण करण्याचा विक्रम आता रसीखच्या नावावर आहे.

जम्मू काश्मीर संघाचे प्रशिक्षक इरफान पठाण तसंच मुंबई इंडियन्स संघाच्या टॅलेंट स्काऊट्सनी रसीखचं नैपुण्य टिपलं होतं. मात्र एका हंगामानंतर मुंबई इंडियन्स संघाने रसीखला रिलीज केलं.

2019मध्ये बीसीसीआयने जन्मदाखल्यात फेरफारप्रकरणी रसीखवर दोन वर्षांची बंदी घातली होती.

मंझूर दर

किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने 2018 मध्ये 20 लाख रुपये खर्चून मंझूर दरला संघात समाविष्ट केलं. आर्थिक तंगीमुळे शाळा सोडावी लागलेल्या मंझूरने सुरक्षारक्षक म्हणूनही काम केलं.

काश्मीरच्या उत्तरेकडील सुगनपोरा गनास्तान हे मंझूरचं मूळ गाव. परिस्थितीशी संघर्ष करून मंझूरने क्रिकेटची धुळाक्षरं गिरवली. किंग्ज इलेव्हन पंजाबने मंझूरला संघात घेतलं परंतु त्याला अंतिम अकरात स्थान मिळू शकलं नाही.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)