You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
MPSC Result: साताऱ्याचा प्रसाद चौगुले राज्यात प्रथम; अंतिम सुधारित निकाल जाहीर
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेचा अंतिम सुधारित निकाल आज जाहीर झाला आहे. साताऱ्याच्या प्रसाद चौगुले याने या परीक्षेत राज्यात पहिला क्रमांक पटकावला असून मानसी पाटील हिने मुलींमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे.
अंतिम निकाल व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
13 जुलै 2019 ते 15 जुलै 2019 या कालावधीमध्ये राज्य लोकसेवा आयोगातून जी परीक्षा घेण्यात आली होती, त्याचा अंतिम निकाल आज जाहीर झाला आहे. एकूण 413 पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती.
ज्यामध्ये उपजिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, पोलीस उपअधीक्षक अशा वेगवेगळ्या 26 पदांचा यामध्ये समावेश होता.
या परीक्षेचा अंतिम निकाल जवळपास दोन वर्षांनी लागला आहे. ज्यात साताऱ्याचा प्रसाद चौगुले राज्यात पहिला आला असून मानसी पाटील ही मुलींमध्ये राज्यात पहिली आली आहे. रोहन कुंवर हा मागासवर्गीयांमध्ये पहिला आला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जाहीर करण्यात आलेल्या 2019 च्या राज्यसेवा परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी नियुक्त्या मिळाव्यात म्हणून आक्रमक भूमिका घेतली होती.
राज्य सेवा परीक्षा होऊन दोन वर्षांचा कालावधी झाला आहे. अद्यापही नियुक्ती न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेत आत्मदहनाचा इशारा दिला होता.
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 ची तारीख जाहीर जाहीर करण्यात आली आहे. येत्या चार डिसेंबरला ही परीक्षा घेतली जाईल. या मुख्य परीक्षेसोबतच महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेचीही तारीख जाहीर करण्यात आली आहे.
अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेचे आयोजन येत्या 18 डिसेंबर रोजी केले जाईल.
औरंगाबाद, अमरावती, मुंबई, नागपूर ,नाशिक, पुणे या जिल्ह्यांतील केंद्रावर या परीक्षांचे आयोजन केले जाणार आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)