नजरकैदेत ठेवायला सोमय्या काय दहशतवादी आहेत की बलात्कारी? - चंद्रकांत पाटील #5मोठ्याबातम्या

किरीट सोमय्या

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1) 'नजरकैदेत ठेवायला सोमय्या काय दहशतवादी आहेत की बलात्कारी?'

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर राज्य सरकारनं केलेल्या कारवाईनंतर महाराष्ट्र भाजपमधील नेते आक्रमक झाले.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील संतप्त होत प्रश्न विचारला की, "नजरकैदेत ठेवायला किरीट सोमय्या दहशतवादी, बलात्कारी की दरोडेखोर आहेत?"

"दहशतवादी उजळ माथ्यानं फिरतायेत. मुंबईमध्ये घातपात करण्यासाठी, बॉम्पस्फोट करण्यासाठी, गॅसच्या माध्यमातून स्फोट घडवण्यासाठी मुंबईमध्ये दहशतवादी काम करतायेत. त्यातले काहीजण पकडले जातायेत. इसं असताना इकडे किरीट सोमय्या भ्रष्टाचारी मंत्र्यांची प्रकरणं काढत असताना कोल्हापूरला येण्यास मनाई करण्यात आली," असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

दंडुकेशाही चालणार नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. लोकमतनं ही बातमी दिलीय.

चंद्रकांत पाटील

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन, चंद्रकांत पाटील

भाजप सोमय्यांच्या पूर्णपणे पाठीशी असून, हा विषय अखेरपर्यंत जाईल, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

2) परिवहन मंत्र्यांच्या एसटी महामंडळातील सचिन वाझे कोण? - पडळकर

"ज्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुविधा आहेत त्याच एसटी कामगारांना द्या, अन्यथा अन्यथा संघर्ष अटळ आहे," असा इशारा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाराष्ट्र सरकारला दिला आहे.

तसंच, परिवहन मंत्र्यांचा महामंडळातला सचिन वाझे कोण? असा सवालही गोपीचंद पडळकर यांनी विचारला आहे. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

एसटी कर्मचाऱ्यांना मिळणारा तुटपुंजा पगार, एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या या मुद्यावरून गोपीचंद पडळकर लढा उभा करणार आहेत.

यासाठी येत्या 21 सप्टेंबरला एसटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी उभारल्या जाणाऱ्या लढ्याची दिशा ठरवण्यासाठी आटपाडी तालुक्यातील झरेमध्ये बैठकीचे आयोजन देखील करण्यात आलं आहे.

"मोठ्या विश्वासानं महाराष्ट्रातील प्रवासी आजही एसटीने प्रवास करतात. पण आपल्या सेवेने एसटी महामंडळाला मोठं करणाऱ्या मराठी कर्मचाऱ्यांवरच आत्महत्येची ही वेळ यावी. ही राग आणणारी आणि अपमान करणारी बाब आहे," असं पडळकर म्हणाले.

3) मनोहर भोसलेला न्यायालयीन कोठडी

संत श्री. बाळूमामांचा अवतार असल्याचं सांगत बारामतीतल्या युवकाची फसवणूक करणाऱ्या मनोहर भोसलेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. पुढारीनं ही बातमी दिलीय.

मनोहर भोसले 10 सप्टेंबरपासून न्यायालयीन कोठडीत आहे. त्याची ही कोठडी वाढवण्यात आलीय.

या गुन्ह्यातील मनोहर भोसलेचा सहकारी ओंकार शिंदे यालाही पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा हा सहकारी अद्याप फरार आहे.

शिवाय, बलात्काराच्या गुन्ह्यात करमाळा पोलिसांच्या ताब्यात मनोहर भोसलेला देण्यास न्यायालयाने परवानगी दिलीय. त्यानुसार करमाळा पोलिसांनी भोसलेला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

4) दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेमधून दिवसाला 1000 ते 1500 कोटी महसूल मिळेल - गडकरी

दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेमधून केंद्र सरकारच्या तिजोरीत टोलच्या माध्यमातून दिवसाला 1000 ते 1500 कोटींची रक्कम जमा होईल, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. 2023 पासून हा एक्स्प्रेस वे सुरू होईल, असंही ते म्हणाले. इकोनॉमिक टाइम्सनं ही बातमी दिलीय.

नितीन गडकरी

फोटो स्रोत, Nitin Gadkari

नॅशनल हायवेज ऑथोरिटी ऑफ इंडिया (NHAI) येत्या पाच वर्षात 1.40 लाख कोटींपर्यंत टोलच्या माध्यमातून उत्पन्न मिळवेल. आता हीच रक्कम 40 हजार कोटींच्या घरात आहे, अशीही माहिती गडकरींनी दिली.

मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस वे चार राज्यांमधून प्रवास करतो. गडकरींनी नुकतेच या मार्गाची पाहणी केली.

5) मोदींच्या वाढदिवशी झालेल्या लसीकरणावर राहुल गांधी म्हणतात, 'इव्हेंट खत्म'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी कोरोनावरील लशींचे अडीच कोटींहून अधिक डोस दिले गेले. या मुद्द्यावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी टीका केलीय. एनडीटीव्हीनं ही बातमी दिलीय.

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

17 सप्टेंबरच्या आधी आणि नंतरच्या लसीकरणाच्या आकडेवारीचा आलेख ट्विटरवर पोस्ट करत राहुल गांधी म्हणाले, "इव्हेंट खत्म"

तसंच, नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी काँग्रेसनं 'बेरोजगारी दिवस', 'किसानविरोधी दिवस', 'कोरोना कुप्रबंधन दिवस' आणि 'महागाई दिवस' असे साजरे करून केंद्र सरकारच्या कारभारावर टीका केली.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)