Rain Update : औरंगाबादचा कन्नड घाट दरड कोसळून ठप्प, भिलदरी पाझर तलाव फुटला

फोटो स्रोत, Social media
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड घाटात दरड कोसळली आहे. त्यात कोणतीही जिवीतहानी झाल्याचं वृत्त अद्याप समोर आलेलं नाही. मात्र अनेक गाड्यांवर दरड कोसळल्याने नुकसान झालं आहे. तसंच महामार्गावर वाहतूक कोंडी झाली असून अनेक गाड्या रात्रीपासून अडकल्या आहेत.
सध्या धुळे-औरंगाबाद-सोलापूर महामार्ग ठप्प आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून दरड हटवण्याचं आणि गाड्या काढण्याचं काम सुरू आहे. परंतु सततच्या पावसामुळे कामात अडथळा येत आहेत. तसंच रस्त्यावर सगळीकडे चिखल झाल्याने गाड्या अडकल्या आहेत.
सोमवारपासून औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस पडतोय. कन्नड घाटातही रात्रभर पाऊस कोसळत होता.
धुळे-औरंगाबाद महामार्ग बंद असल्याने पोलिसांनी पर्यायी मार्गाने प्रवास करावा असं आवाहन केलं आहे. औरंगाबाला जाण्यसाठी चाळीसगावमार्गे प्रवास करावा तर पुण्याहून औरंगाबादला जायचे असल्यास जळगाव मार्गाने जावं, असंही आवाहन करण्यात आलं आहे.
मुसळधार पावसामुळे भिलदरी पाझर तलाव फुटला असून आसपासच्या गावांचा संपर्क तुटला आहे. नागद गावातील परिस्थिती भीषण असल्याची माहिती समोर येत आहे.
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस
- गिरणा, तितूर आणि डोंगरी या तिन्ही नद्यांना मोठ्या प्रमाणावर पूर आला आहे. या पुराच्या पाण्यात चाळीसगाव तालुक्यातील वाकडी गावातील 63 वर्षीय वृद्धा कलाबाई पांचाळ या वाहून गेल्या आहेत.
- चाळीसगाव शहरासह आजूबाजूच्या वाकडी, रोकडे, वाघडू, वाघळी, खिर्डे, लोंजे, जांभळी, मुंदखेडे, रहिपुरीसह 15 गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे.
- चाळीसगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये पुरामुळे शेकडो गुरे वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
- काही गावांमध्ये लोक अडकले असून, त्यांना बाहेर काढण्यासाठी एसडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. या पथकात 35 जणांचा समावेश असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीर रावळ यांनी दिली आहे.
- पुराच्या घटनेची माहिती मिळताच आमदार मंगेश चव्हाण, माजीमंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, तहसीलदार अमोल मोरे आदींसह इतर विभागाचे अधिकारी चाळीसगावात दाखल झाले आहेत.
- पिपरखेड या गावी पुराच्या पाण्यात एका अनोळखी इसमाचा मृतदेह वाहून आला असून, त्याची ओळख पटलेली नाही.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)























