तालिबान : काबूल विमानतळावर भारतीयांबरोबर नेमकं काय काय घडलं?

एयरपोर्टजवळ उभे असलेल भारतीय

फोटो स्रोत, Ravinder Singh Robin

फोटो कॅप्शन, एयरपोर्टजवळ उभे असलेल भारतीय
    • Author, रविंदर सिंह रॉबिन
    • Role, बीबीसी हिंदीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 2 मिनिटे

भारताचं परराष्ट्र मंत्रालय अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांना सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या लोकांना आणलं जात आहे, त्यात अफगाण, हिंदू आणि शीखही आहेत.

"आम्ही भारतीयांना काबूलमधून काढण्याचा प्रयत्न करत आहोत," असं परराष्ट्र मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं.

काबूल विमानतळ अमेरिकेच्या सैनिकांच्या ताब्यात असून बाहेर तालिबानी तैनात आहेत.

लोक हजारोंच्या संख्येनं विमानतळावर जाण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्यांना आत जाता येत नाही, असं त्याठिकाणी उपस्थित असलेल्यांचं म्हणणं आहे. भारतही भारतीय नागरिकांना विमानतळावर पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे.

'कुठलाही अधिकारी उपस्थित नाही'

"दोन दिवसांपासून आम्हाला विमानतळावर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे," असं विमानतळाजवळ उपस्थित भारतीय नागरिकांमध्ये असलेल्या एकानं बीबीसीशी फोनवरून बोलताना सांगितलं.

"भारताचा एकही अधिकारी याठिकाणी उपस्थित नाही. आम्हाला कंत्राटदारांमार्फत आणलं जात आहे," असंही त्यांनी सांगितलं.

काबूल

फोटो स्रोत, Ravinder Singh Robin

"गेल्या दोन दिवसांपासून आम्हाला एअरपोर्टजवळ असलेल्या वेडिंग हॉलमध्ये ठेवण्यात आलं होतं," असं याच गटातील दुसऱ्या एका व्यक्तीनं सांगितलं.

तालिबाननं शनिवारी सकाळी या सर्वांना सोबत नेलं होतं असं, या दहा बसमध्ये असलेल्या नागरिकांच्या ताफ्याची जबाबदारी असलेल्या व्यक्तीनं सांगितलं.

या गटाचे समन्वयक असलेले भारतीय नागरिक झुहेब यांनी याबाबत बीबीसीला माहिती दिली. "तालिबानचे दोन-दोन योद्धे आमच्या बसमध्ये चढले आणि बस सोबत घेऊन गेले. त्यांनी अफगाण हिंदू आणि शीख यांना भारतीय नागरिकांपासून वेगळं केलं. काही शीख आणि हिंदू भीतीपोटी गुरुद्वाऱ्यात गेले. तालिबाननं भारतीयांच्या कागदपत्रांची पाहणी केली आणि त्यानंतर त्यांना एअरपोर्टजवळच असलेल्या एका कारखान्यात पाठवलं. त्याठिकाणी हे लोक कंटेनरमध्ये बसलेले आहेत. लवकरच या सर्वांना एअरपोर्टला पाठवणार असल्याचं तालिबानचं म्हणणं आहे. तालिबाननं काही भारतीयांची चौकशी करून काहींचे मोबाईलही फोडले.''

भारतीय आणि अफगाण नागरिक रात्री दहा वाजेपासून एअरपोर्टजवळ बसमध्ये बसले होते. जाहीद नावाच्या एका भारतीयाचा मोबाईल तालिबाननं घेतला आणि त्याच्याबाबत अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही, असं अफगाणी शीख अनारकली कौर यांनी बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं.

परराष्ट्र मंत्रालयानं काय म्हटलं?

दरम्यान अद्याप या घटनेबाबत दुजोरा मिळू शकलेला नाही. अफगाणिस्तानच्या माध्यमांत भारतीयांच्या अपहरणाची बातमीही नाही, असं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची बीबीसाबरोबर बोलताना म्हणाले.

अरिंदम बागची

फोटो स्रोत, Ani

फोटो कॅप्शन, अरिंदम बागची

तालिबानच्या प्रवक्त्यांनीही स्थानिक माध्यमांशी बोलताना अपहरणचा वृत्त फेटाळलं आहे. भारतीयांचं अपहरण करण्यात आलेलं नसून, त्यांना विमानतळावर पोहोचवलं जात असल्याचं, काबूलमधील तालिबानचे प्रवक्ते अमानुल्ला वासिक यांनी सांगितलं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)