उद्धव ठाकरे : 'अशी एक झापड देऊ की धमक्या देणारे पुन्हा कधी उठणार नाहीत' #5मोठ्याबातम्या

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, FACEBOOK/UDDHAV THACKERAY

फोटो कॅप्शन, उद्धव ठाकरे
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. 'अशी एक झापड देऊ की धमक्या देणारे पुन्हा कधी उठणार नाहीत'

'आम्हाला कोणी थपडा मारण्याच्या धमक्या देऊ नयेत, नाहीतर अशी एक झापड देऊ की धमक्या देणारे पुन्हा कधी उठणार नाहीत,' असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या आमदारांचे नाव न घेता दिला आहे. लोकमतनं ही बातमी दिली आहे.

मुंबईच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन फोडण्याबाबत विधान केलं होतं.

शिवसेनेतून संताप व्यक्त होऊ लागल्यावर प्रसाद लाड यांनी सारवासारव केली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत आदर असून त्यांच्या सेनाभवन फोडण्याचा प्रश्नच नाही. माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ निघाला, असा खुलासा लाड यांनी केला होता.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या विधानावर आता भाजपने प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय, "थापड-झापडची भाषा मुख्यमंत्र्यांनी करणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. विरोधकांनी टीका केली असली तरी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी अशी भाषा वापरणे योग्य नाही.

"ते जरी एखाद्या पक्षाचे प्रमुख असले तरी ते आता राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्याने अशी टीका करणे सयुक्तिक नाही."

2. राजभवन भाजप कार्यालय झालंय - नाना पटोले

राजभवन हे भाजप कार्यालय झालं आहे. राज्यपाल हे भाजप कार्यकर्त्यासारखे वागत असल्याचं वक्तव्य महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. ते पुण्यात बोलत होते.

एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

नाना पटोले

फोटो स्रोत, Nana Patole/facebook

फोटो कॅप्शन, नाना पटोले

पटोले म्हणाले, "माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल राज्यपाल बोलले. देशाचं वाटोळं नेहरू यांच्यामुळे झालं असं ते बोलले.

"राज्यपाल पदावर बसून राजकारण करता येत नाही . राजभवन हे भाजप कार्यालय झालं आहे, राज्यपाल भाजप कार्यकर्त्यासारखे वागत आहेत. विधानसभेतही मी हे बोललो आहे."

3. सैन्यावर दगडफेक करणाऱ्यांना पासपोर्ट, सरकारी नोकरी नाही

जम्मू काश्मीरमध्ये सैन्यावर दगडफेक करणाऱ्यांना यापुढे पासपोर्ट मिळणार नसून त्यांना सरकारी नोकरी मिळणार नाही. जम्मू-काश्मीर पोलिसांनी असे आदेश जारी केले आहेत. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिली आहे.

काश्मीर

फोटो स्रोत, EPA/JAIPAL SINGH

या आदेशानुसार, पोलिसांवर किंवा सुरक्षा दलातील जवानांवर कुठल्याही प्रकारचा हल्ला करण्याचा आरोप असलेल्या व्यक्तींना कुठल्याही प्रकारचा सिक्युरिटी क्लिअरन्स दिला जाणार नाही.

दगडफेक केल्याचा व्हीडिओ आणि पोलीस रेकॉर्ड यांच्या साहाय्यानं अशा व्यक्तींवर कारवाई केली जाणार आहे. राज्यातील हिंसाचार आणि सुरक्षा दलांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी सरकारनं हे पाऊल उचललं आहे.

4. मेळघाटात 3 महिन्यांत 49 बालमृत्यू

मेळघाटात एप्रिल ते जून या तीन महिन्यांत सहा वर्षांपर्यंतच्या तब्बल 49 बालकांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. त्यात 29 दिवस ते 1 वर्षांपर्यंतच्या 17 बालकांचा समावेश आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

मेळघाटात गेल्या वर्षी एप्रिलपासून ते यंदा मार्चपर्यंत 6 वर्षांपर्यंतचे 213 बालमृत्यू झाले. उपजत मृत्यूंची संख्या 113, तर 10 मातामृत्यू झाले आहेत.

कुपोषण

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातनिधिक फोटो

यातील 130 बालमृत्यू हे शून्य ते एक वर्षांच्या बालकांचे आहेत. शून्य ते सात दिवसांच्या 81 बालकांचा मृत्यू झाला.

जोखमीच्या क्षणी बाळांना बालरोगतज्ज्ञांनी घरोघरी जाऊन तपासणी करून आरोग्य सेवा पुरवणं, तसंच प्रसूतितज्ज्ञांनीही घरांत जाऊन तपासणी करणं आवश्यक असल्याचं स्वयंसेवी संस्थांचं म्हणणं आहे.

5. भुवनेश्वर हे 100 % लसीकरण पूर्ण करणारं पहिलं शहर

ओडिशाची राजधानी भुवनेश्वर हे 100 % लसीकरण पूर्ण करणारं देशातलं पहिलं शहर ठरलं आहे. सकाळनं ही बातमी दिली आहे.

भुवनेश्वर महापालिकेचे साऊथ-ईस्ट झोनल उपायुक्त अंशुमन रथ म्हणाले, "भुवनेश्वरमधील शंभर टक्के लोकसंख्येचं लसीकरण पूर्ण झालं आहे. त्याशिवाय या शहरातील सुमारे एक लाख स्थलांतरित नागरिकांनाही कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे."

कोरोना लस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

भुवनेश्वरच्या जनतेनं लसीकरण मोहिमेला दिलेला मोठा प्रतिसाद त्याचबरोबर पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मेहनत याच्या जोरावर भुवनेश्वर हे देशातील पहिलं शंभर टक्के लसीकरण पूर्ण करणार शहर ठरलं, असं उपायुक्त रथ यांनी सांगितलं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)