You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
CBSE बोर्डाच्या बारावीचा निकाल आज दुपारी 2 वाजता जाहीर होणार, 'इथे' पाहा निकाल
सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अर्थात CBSE बोर्डाच्या बारावी परीक्षेचा निकाल आज (30 जुलै) जाहीर होणार आहे.
आज दुपारी 2 वाजता बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर बारावीचा निकाल जाहीर केला जाईल.
रिझल्ट पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना या लिंकवर क्लिक करून CBSE च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
याशिवाय डिजीलॉकर या अॅपवरही विद्यार्थी रिझल्ट पाहू शकतात. रिझल्टची प्रत ते याठिकाणी डाऊनलोड करून घेऊ शकतात.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी CBSE बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना दहावी ते बारावीपर्यंतच्या त्यांच्या कामगिरीनुसार गुण देण्यात येणार आहेत.
त्यासाठी दहावी, अकरावी आणि बारावीतील विद्यार्थ्यांच्या कामगिरीचं मोजमाप अनुक्रमे 30:30:40 या प्रमाणात करण्यात येणार आहे.
याव्यतिरिक्त निकालानंतर CBSE बोर्डाकडून एका परीक्षेचंही आयोजन करण्यात येणार आहे. आपल्या बारावीच्या निकालावर समाधानी नसलेल्या व्यक्तींना ही परीक्षा देता येऊ शकेल.
कोरोनामुळे अवलंबण्यात आलेल्या गुणदान पद्धतीमुळे आपल्याला कमी मार्क पडले, असं वाटत असल्यास कामगिरी उंचावण्यासाठी असे विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतील.
मागील वर्षी 88.78 टक्के विद्यार्थी CBSE बोर्ड बारावी परीक्षेत उत्तीर्ण झाले. 2019 पेक्षा ही आकडेवारी 5.38 टक्क्यांनी जास्त होती. 2020 मध्ये मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 92.15 टक्के तर मुलांचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 86.19 इतकं होतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)