जम्मू : मध्यरात्री दिसले आणखी 2 ड्रोन, लष्कराने गोळीबार करून उडवले

ड्रोन

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

जम्मू येथील वायूदलाच्या तळावर रविवारी (27 जून) रात्री 2 वाजण्याच्या सुमारास झालेल्या दोन ह्लल्यांनंतर भारतीय लष्करानं निवेदन प्रसिद्ध केलं आहे.

त्यात म्हटलं, 27 आणि 28 जून या दोन दिवशी मध्यरात्री 2 ड्रोन्सची हालचाल दिसून आली आहे.

लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल देवेंद्र आनंद यांनी म्हटलं आहे की, "भारतीय लष्कराला रतनूचक-कालूचक लष्करी भागात ही हालचाल दिसून आली आणि यानंतर सुरक्षादलांना याविषयी अलर्ट करण्यात आलं आहे."

त्वरित हाय अलर्टची घोषणा करण्यात आली आणि त्यानंतर क्विक रिकॅक्शन टीमने गोळीबार केला.

गोळीबारानंतर हे दोन्ही ड्रोन उडून गेले आणि सर्तकतेमुळे सुरक्षादलानं एका मोठ्या धोक्याला संपुष्टात आणलं, असंही लष्करानं म्हटलंय.

यात असंही म्हटलंय की, सुरक्षादल हाय अलर्ट वर असून याबाबत अधिक तपासणी सुरू आहे.

वायूदलाच्या तळावर स्फोट

जम्मू येथीस वायूदलाच्या तळावर रविवारी रात्री दोन स्फोट झाले. जम्मू-काश्मीरच्या पोलिसांनी 'दहशतवादी हल्ल्या'अंतर्गत हे प्रकरण नोंदवलं आहे.

डीजीपी दिलबाग सिंग यांही हे स्फोट म्हणजे 'दहशतवादी हल्ला' असल्याचं म्हटलं आहे. पोलीस, वायूदल आणि इतर संस्था याप्रकरणाची चौकशी करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

पोलीस

फोटो स्रोत, Getty Images

याआधी भारतीय वायूदलानं जम्मू इथल्या तळावरील टेक्निकल एरियामध्ये झालेल्या हल्ल्यांची माहिती दिली होती.

वायूदलानं ट्विटरवर म्हटलं होतं, "रविवारी सकाळी जम्मू-एयर फोर्स स्टेशनवरील टेक्निकल एरियामध्ये कमी तीव्रतेचे दोन स्फोट झाले.एका हल्ल्यामुळे इमारतीच्या छपराचं नुकसान झालं आहे, तर दुसरा स्फोट हा मोकळ्या जागेवर झाला."

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

या घटनेत कोणत्याही सामानाचं नुकसान झालेलं नाही आणि संस्थांसोबत मिळून चौकशी सुरू आहे, असं वायूदलानं एका ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

वृत्तसंस्था पीटीआयनं अधिकाऱ्यांचा हवाला देत म्हटलं आहे की, वायूदलाचे दोन जवान जखमी झालेत. दोन्ही स्फोटांच्या मध्ये 6 मिनिटांचं अंतर होतं.

पहिला ड्रोन हल्ला

हा भारतातील पहिला ड्रोन हल्ला असल्याचं अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. असं असलं तरी यावर अद्याप सविस्तर चौकशी होणं बाकी आहे.

भारतीय लष्करानं आतापर्यंत यावर काही म्हटलं नाहीये. पण, जम्मू-काश्मीर पोलीसचे प्रमुख दिलबाग सिंग यांनी म्हटलं की, पोलिसांनी अजून एका हल्ल्याला अपयशी ठरवलं आहे.

ड्रोन

फोटो स्रोत, Getty Images

जम्मू-काश्मीर पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी बीबीसीचे सहयोगी पत्रकार रविंदर सिंह रॉबिन यांना सांगितलं, "जम्मू पोलिसांनी 5-6 किलो वजनाचा एक आयईडी ताब्यात घेतला आहे. हा आयईडी लष्करच्या एका एजंटला मिळाला होता. शहरातील गर्दीच्या एखाद्या ठिकाणी हा आयईडी लावण्याचा त्याचा प्रयत्न होता.

"हा आयईडी पोलिसांच्या ताब्यात आल्याने मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न फसला आहे. पकडण्यात आलेल्या संशयित व्यक्तीची चौकशी सुरू आहे. अधिक माहिती हातात आल्यानंतर इतरही काही संशयितांना अटक केली जाऊ शकते. इतर तपास संस्थांसोबत जम्मू पोलीस एअर फोर्स स्टेशनवर झालेल्या हल्ल्याचा तपास करत आहेत."

जम्मू एअर फोर्स स्टेशनवर झालेल्या दोन हल्ल्यांमध्ये वापरण्यात आलेली स्फोटकं ड्रोनचा वापर करून टाकण्यात आल्याचा संशय असल्याचंही त्यांनी सांगितलं.

डीजीपी दिलबाग सिंग

फोटो स्रोत, Ani

फोटो कॅप्शन, डीजीपी दिलबाग सिंग

द इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्रानं सूत्रांच्या हवाल्यानं लिहिलंय, या दहशतवादी हल्ल्यात दोन ड्रोन वापरण्यात आले, ज्यात 'उच्च प्रती'ची स्फोटक सामुग्रीचा वापर करण्यात आली होती.

राष्ट्रीय सुरक्षा संस्था आणि राष्ट्रीय सुरक्षा गार्डच्या बॉम्ब डेटा सेंटरची टीम भारतीय वायूदलाच्या प्रत्येक तळाची चौकशी करत आहे. तर जम्मू पोलिसांनी दहशतवादाच्या कलमाअंतर्गत हे प्रकरण नोंदवलं आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)