'जम्मू एअर फोर्स स्टेशनवर झालेला हल्ला दहशतवादी'- डीजीपी दिलबाग सिंह

जम्मू

फोटो स्रोत, ANI

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी जम्मू एअर फोर्स स्टेशनवर रविवारी (27 जून) झालेले दोन हल्ले 'दहशतवादी' असल्याचं म्हटलं आहे. पोलिस, हवाई दल आणि दुसऱ्या तपास संस्था या हल्ल्याचा तपास करत आहेत.

जम्मू एअर फोर्सच्या तांत्रिक भागात स्फोट झाला. हा स्फोट कमी तीव्रतेचा असल्याची माहिती भारतीय वायुसेनेनं दिली.

भारतीय वायुसेनेनं ट्विटवरून दिलेल्या माहितीनुसार, "रविवारी (27 जून) सकाळी जम्मू एअर फोर्स स्टेशनच्या टेक्निकल एरियात कमी तीव्रतेचे दोन स्फोट झाले. एका स्फोटामुळे इमारतीच्या छपराचं नुकसान झालं, तर दुसरा स्फोट उघड्या जागी झाला."

वायुसेनेनं दुसऱ्या ट्वीटमध्ये सांगितलं की, या स्फोटामुळे कुठल्याही साहित्याचं नुकसान झालं नाही आणि नागरी यंत्रणांद्वारे या घटनेची चौकशी सुरू झालीय.

जम्मू

फोटो स्रोत, Twitter

रात्री दोन वाजल्याच्या सुमारास हे स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. एअर फोर्स स्टेशनच्या टेक्निकल एरियाचा वापर भारतीय वायुसेना करते. तिथेच हे स्फोट झाले.

बीबीसीचे सहयोगी पत्रकार मोहित कंधारी यांच्या माहितीनुसार, "जम्मू एअरपोर्टचं हवाईपट्टी आणि ट्रॅफिक कंट्रोल भारतीय वायुसेनेच्या नियंत्रणात आहे. इथून सर्वसामान्य प्रवाशांच्या विमानांचंही उड्डाण होतं."

दरम्यान, स्फोट झालेल्या ठिकाणी फॉरेन्सिक टीम दाखल झाली असून, त्यांनी चौकशी सुरू केली आहे. या पथकानं काही गोष्टी तिथून जमाही केल्या आहेत.

मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न फसला- डीजीपी दिलबाग सिंह

जम्मू-काश्मिर पोलिस महासंचालक दिलबाग सिंह यांनी बीबीसीचे सहयोगी पत्रकार रविंदर सिंह रॉबिन यांना सांगितलं, "जम्मू पोलिसांनी 5-6 किलो वजनाचा एक आयईडी ताब्यात घेतला आहे. हा आयईडी लष्करच्या एका एजंटला मिळाला होता. शहरातील गर्दीच्या एखाद्या ठिकाणी हा आयईडी लावण्याचा त्याचा प्रयत्न होता.

डीजीपी दिलबाग सिंह

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, डीजीपी दिलबाग सिंह

हा आयईडी पोलिसांच्या ताब्यात आल्याने मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न फसला आहे. पकडण्यात आलेल्या संशयित व्यक्तीची चौकशी सुरू आहे. अधिक माहिती हातात आल्यानंतर इतरही काही संशयितांना अटक केली जाऊ शकते. इतर तपास संस्थांसोबत जम्मू पोलिस एअर फोर्स स्टेशनवर झालेल्या हल्ल्याचा तपास करत आहे."

जम्मू एअर फोर्स स्टेशनवर झालेल्या दोन हल्ल्यांमध्ये वापरण्यात आलेली स्फोटकं ड्रोनचा वापर करून टाकण्यात आल्याचा संशय असल्याचंही त्यांनी सांगितलं.

या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

"या प्रकरणी जम्मू-काश्मीर पोलिसांनी UAPA च्या कलम 16, 18, 23 अंतर्गत तसंच आयपीसीच्या कलम 307 आणि 120 बी अंतर्गत एफआयआर दाखल केली आहे."

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

या स्फोटाबाबत लगेचच काही विधान करणं घाईचं ठरू शकतं. मात्र एअरफोर्सनं ट्विटमध्ये टेक्निकल एरियाचा उल्लेख केला आहे. ही चिंतेची बाब असल्याचं बीबीसी प्रतिनिधी जुगल पुरोहित यांनी म्हटलं आहे.

टेक्निकल एरिया एअरफोर्सचं सेंटर आहे. याला सर्वात महत्त्वाचा विभागही म्हणता येईल. त्याचं कारण म्हणजे याठिकाणी सर्व सुटे भाग, एअरक्राफ्ट आणि हेलिकॉप्टर असतात. त्यामुळं हे महत्त्वाचं असल्याचं जुगल यांनी सांगितलं.

याठिकाणी सर्व हार्डवेअर ठेवलं जातं. कोणत्याही एअरफोर्स बेसचे दोन प्रमुख भाग असतात. एक म्हणजे टेक्निकल एरिया आणि दुसरा म्हणजे अॅडमिनिस्ट्रेटिव्ह एरिया (प्रशासकीय विभाग). त्यामुळं हा हल्ला अधिक गंभीर आहे. त्यामुळं याबाबत केवळ दोन लहान स्फोट असा विचार करून चालणार नाही, असंही जुगल यांनी म्हटलं.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

आम्ही एअरफोर्स आहोत आणि आम्हाला आमचा भाग हवाई हल्ल्यांपासून वाचवायचा आहे, असं पठाणकोट हल्ला झाला त्यावेळी त्याठिकाणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटल्याचंही उदाहरणही जुगल यांनी दिलं.

एवढं महत्त्वाचं का आहे जम्मू एअरफोर्स स्टेशन?

जम्मू विमानतळ हा एक प्रादेशिक विमानतळ आहे. भारत - पाकिस्तान दरम्यानच्या आंतरराष्ट्रीय सीमेपासून ते केवळ 14 किलोमीटर अंतरावर आहे, अशी माहिती जम्मूमधील बीबीसीचे सहयोगी मोहीत कंधारी यांनी दिली.

भारतीय हवाई दलाची या भागातील ही अत्यंत महत्त्वाची अशी मालमत्ता आहे. कारण विविध भागांशी हे जोडलेलं असून याठिकाणाहूनच विविध गोष्टींचा पुरवठाही केला जातो. माल वाहतुकीसाठी वापरले जाणारे बहुतांश हेलिकॉप्टर आणि आपत्तीच्या काळात मदतीसाठीच्या अनेक मोहिमाही याच बेसवरून राबवल्या जातात.

हे स्टेशन भारतीय हवाई दलाच्या सर्वात जुन्या विमानतळांपैकी एक आहे. याचठिकाणी 10 मार्च 1948 ला विंग क्रमांक 1 ची स्थापना झाली होती. या विंगचं काम उन्हाळ्यात श्रीनगर आणि थंडीमध्ये जम्मूमधून चालायचं.

25 जानेवारी 1963 ला विंग कमांडर जे यांच्या नेतृत्वात जम्मूमध्ये नंबर 23 विंगची स्थापना करण्यात आली. त्यानंतर अँड्र्यूज आणि नंबर 1 विंगला कायमचं श्रीनगरला हलवण्यात आलं होतं.

स्वातंत्र्यापूर्वी सियालकोट-जम्मू रेल्वे लाइन जिथं संपायची त्याचठिकाणी सध्या जम्मू एअरफोर्स स्टेशन आहे.

जम्मू एअरफोर्स स्टेशन ही हेलिकॉप्टर्स ठेवण्याची सर्वात महत्त्वाची जागा आहे.

सुरुवातीला इथं केवळ MI-4 हेलिकॉप्टर होते. पण नंतर चेतक आणि आता 130 हेलिकॉप्टर युनिटचे MI-17 हेलिकॉप्टरही इथं असतात.

जम्मू-काश्मीरच्या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये हे हेलिकॉप्टर म्हणजे मदतीसाठी सर्वात विश्वसनीय असं माध्यम आहे. जगातील सर्वात उंच युद्धतळ असलेल्या सियाचिन ग्लेशिअरची देखभालही यांच्या मदतीनंच केली जाते. सियाचिन ग्लेशिअरच्या सुरक्षेत एवढी महत्त्वाची भूमिका असल्यामुळंच या स्टेशनला "ग्लेशिअरचे संरक्षक" असं नाव देण्यात आलं आहे.

कारगिल युद्धाच्यावेळी सैनिकांना रसद पुरवण्यासाठी मदत करणं असो किंवा जखमी सैनिकांना परत आणणं, अशा अनेक प्रसंगांमध्ये जम्मू एअरफोर्स स्टेशन कायम या परिसरात भारतीय सैन्याला मदत पोहोचवण्याचं प्रमुख माध्यम ठरलं आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)