भारतातलं असं गाव जिथं आजही ना वीज आहे ना मोबाईल फोन!

व्हीडिओ कॅप्शन, भारतातलं असं गाव जिथं आजही ना वीज आहे ना मोबाईल फोन!
भारतातलं असं गाव जिथं आजही ना वीज आहे ना मोबाईल फोन!
Published

या गावात वीजही नाही आणि मोबाईल फोनही नाहीत आणि इथे लोक आजही चुलीवर स्वयंपाक करतात.

या गावाचं नाव आहे कुर्मा. या गावातील लोक स्वयंपाकासाठी गॅसऐवजी सुकी लाकडं, पालापाचोळा आणि शेणाच्या गोवऱ्या वापरतात.

या गावातील लोकांचं म्हणणं आहे की, बाहेरून आणाव्या लागणाऱ्या कच्च्या मालावर अवलंबून राहण्याऐवजी इथेच उपलब्ध असलेल्या वस्तू वापरणं कधीही चांगलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)