मुंबई पाऊस: खड्ड्यात बुडाली पूर्ण कार, व्हीडिओ व्हायरल

फोटो स्रोत, Scial media viral photo
मुंबईत एक कार खड्ड्यात बुडतानाचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
एका ठिकाणी पार्क केलेली कार त्याच ठिकाणी अचानक बुडू लागते, असं या व्हीडिओमध्ये दिसतं.
मुंबईतील घाटकोपर परिसरातील हा व्हीडिओ असल्याची माहिती समोर आली आहे.
ही घटना रविवारी (13 जून) सकाळी घाटकोपर पश्चिम भागात घडली.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर करून बृहन्मुंबई महापालिकेच्या कारभारावर टीका केली आहे.
सोमय्या यांनी व्हीडिओ शेअर करताच काही वेळात व्हीडिओ सर्वत्र व्हायरल होत असल्याचं दिसून येत आहे.
या व्हीडिओवर बरीच चर्चा सुरू असून अनेक संतप्त प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत.
पण बृहन्मुंबई महापालिकेने मात्र आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
कार खड्ड्यात बुडण्याचा आणि आपला काही एक संबंध नाही, असं स्पष्टीकरण मुंबई महापालिकेने दिलं.
कार खड्ड्यात कशी बुडली?
एवढी मोठी कार एका खड्ड्यात कशी बुडाली, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. याबाबत सर्वत्र उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

फोटो स्रोत, Scocial media viral photo
मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपरमधील एका सोसायटीत एक विहीर होती. त्या विहिरीवर सिमेंट काँक्रिटचं स्लॅब बांधून ही पार्किंगची जागा तयार करण्यात आली होती. याच स्लॅबवर कार उभी होती. या ठिकाणी इतर अनेक कार पार्क केलेल्या आपल्याला व्हीडिओत दिसेल.
ही जिथं उभी होती तो भाग खचला. त्यामुळे खाली मोठा खड्डा तयार झाला. दुर्दैवाने कारच्या समोरील भाग या खड्ड्यात बुडत गेला. अखेर संपूर्ण कारच या खड्ड्यात गायब झाल्याचं दिसून येतं.
या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना तसंच वाहतूक नियंत्रण कक्षाला देण्यात आली आहे. संबंधित घटनेचा तपास घाटकोपर पोलिसांकडून सुरू आहे.
"आमच्या डोळ्यादेखत ही कार बुडाली. सुदैवाने कुणालाही काही दुखापत झाली नाही," असं कारचे मालक डॉ. किरण दोषी यांनी माध्यमांना सांगितलं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























