You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तौक्ते चक्रीवादळ : P-305 बार्जवरील 186 जणांना आतापर्यंत वाचवलं, मृतांचा आकडा 86 वर
तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसल्यानंतर नौदलाचे बचावकार्य अद्यापही सुरू आहे. या चक्रीवादळात P-305 हे जहाज बुडालं होतं. या ठिकाणी मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या 86 वर गेली आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
मुंबईजवळच्या समुद्रात बुडलेल्या P-305 बार्जवरून 186 जणांना आतापर्यंत वाचवण्यात आलंय.
मृतांमध्ये बार्जवरील 75 जणांचा, तर टग बोटीतल्या 11 जणांचा समावेश आहे.
P-305 बार्जवर एकूण 261 कर्मचारी होते. बॉम्बे हाय जवळच्या समुद्रात ही बार्ज तौक्ते चक्रीवादळादरम्यान बुडली.
केवळ नौदलामुळे आज आपण जिवंत असल्याचं या बार्जवरून सुटका करण्यात आलेल्या एका कर्मचाऱ्याने ANI वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.
INS तेग, INS बेटवा, INS बिआस, P81 विमान आणि सी किंग हेलिकॉप्टर्स बेपत्ता लोकांचा शोध घेत आहेत.
सुटका करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचा तपशील ONGC आणि Afcons कंपन्यांना देण्यात आला असून या बार्जवरच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना माहिती मिळावी म्हणून काही फोन नंबर्स देण्यात आले आहेत.
AFCONS हेल्पडेस्क :कुलदीप सिंग - +919987548113, 022-71987192प्रसून गोस्वामी - 8802062853ONGC हेल्पलाईन : 022-26274019, 022-26274020, 022-26274021
P 305 बार्ज ही भारतात तेल उत्पादन करणाऱ्या ONGC कंपनीची असून तौक्ते वादळाच्या तडाख्यामुळे या बार्जला समुद्रात रोखून धरणारे नांगर निघाले.
नौदलाने गेल्या काही काळात राबवलेल्या सर्वांत कठीण बचाव मोहीमांपैकी ही एक मोहीम आहे. गल कन्स्ट्रक्टर या आणखी एका बार्जवरील 137 जणांनाही नौदल आणि तटरक्षक दलानं मंगळवारी सहीसलामत वाचवलं. कुलाबा पॉइंटपासून भरकटलेलं हे जहाज पालघरमधल्या माहिमजवळ गेलं होतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)