You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लस: सीरम म्हणते, 'भारतीय लोकांच्या जीवाशी खेळून कंपनीनं कधीही लस निर्यात केली नाही'
भारतात लस तयार करणारी सर्वांत मोठी कंपनी म्हणून ओळखली जाणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं (एसआयआय) एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे. भारतीय लोकांच्या जीवाशी खेळून कंपनीनं कधीही लस निर्यात केली नाही असं या पत्रकात म्हटलं आहे.
कंपनीने या पत्रकात म्हटलं आहे की, "गेल्या काही दिवसांमध्ये आपलं सरकार आणि देशातील लस बनवणाऱ्या एसआयआयसह इतर कंपन्यांनी लस निर्यात केल्याबद्दल चर्चा सुरू आहे."
"कोणताही निष्कर्ष काढण्याआधी काही प्रमुख गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे असं मत कंपनीद्वारे व्यक्त करण्यात आलं आहे. भारतातील कोव्हिड लसीकरण मोहिमेसाठी जे काही शक्य असेल ते सर्व सीरम कंपनी करत राहिल," असं कंपनीनं म्हटलं आहे.
कंपनीचे सीईओ आदर पुनावाला म्हणतात, "भारत जगातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. इतक्या मोठ्या लोकसंख्येचं लसीकरण दोन-तीन महिन्यांत होऊ शकत नाही. जगातील सर्व लोकसंख्येला लस पुरवण्यासाठी दोन-तीन वर्षं लागू शकतात हे समजून घ्यायला लोक तयार दिसत नाहीत."
सीरम कंपनी म्हणते, "ही साथ भौगोलिक आणि राजकीय सीमांपुरती मर्यादित नाही. जगातील प्रत्येक व्यक्ती या विषाणूला वैश्विक पातळीवर हरवण्याइतपत सक्षम होत नाही तोपर्यंत आपण सुरक्षित नाही. याशिवाय वैश्विक आघाडीचा एक भाग म्हणून कोव्हॅक्सप्रती काही कर्तव्यं आहेत, त्यामुळे साथीला संपवण्यासाठी जगभरात लस पुरवल्या जाऊ शकतील."
कोव्हॅक्स ही एक जागतिक मोहीम आहे. त्याअंतर्गत 90 विकसनशील आणि गरीब देशातील लोकांना कोरोना लस पुरवण्याचं लक्ष्य निश्चित केलं गेलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)