You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लस: सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकच्या लशीची नेमकी किंमत काय?
सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या दोन्ही लस उत्पादक कंपन्यांनी आपापल्या लशीची किंमत कमी केली आहे.
भारत बायोटेक कोव्हॅक्सिन ही लस राज्यांना आता प्रति डोस 400 रुपये दराने देणार आहे. कंपनीने 200 रुपयांनी लसीचा दर कमी केला आहे. याआधीची लसीची किंमत प्रति डोस 600 रुपये इतकी होती.
भारत बायोटेकने यासंदर्भात एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे.
28 एप्रिलला सीरम इन्स्टिट्यूटनेही कोव्हिशिल्ड लसीचे राज्यांसाठीचे दर शंभर रुपयांनी कमी केल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे कोविशिल्डची ही लस आता 300 रुपये प्रति डोस अशी मिळेल. यापूर्वी लशीची किंमत 400 रुपये प्रति डोस इतकी होती.
कंपन्यांनी काय म्हटलं?
देशातील कोरोना आरोग्य संकटाची परिस्थिती गंभीर होत चालल्याने आरोग्य यंत्रणांसमोर मोठे आव्हान आहे. त्यामुळे राज्यांसाठी आम्ही आता कोवॅक्सिनची किंमत 400 रुपये प्रति डोस करत आहोत, असं भारत बायोटेकने म्हटलंय.
खुल्या बाजारात मात्र भारत बायोटेकने आधी जाहीर केलेले दर लागू असतील, असंही पत्रात स्पष्ट करण्यात आलं आहे.
तर सीरम इन्स्टिट्यूटच्या अदार पुनावाला यांनी म्हटलंय,आम्ही राज्यासांठी लसीचा दर प्रति डोस 100 रुपयांनी कमी करत आहोत. यामुळे लसीकरण मोहिमेला वेग मिळेल आणि राज्यांचे कोट्यवधी रुपये वाचतील.
सुरुवातीला केंद्र सरकारसाठी लसीचे दर वेगळे होते आणि राज्य सरकारसाठी लस उत्पादकांनी वेगळे दर जाहीर केले होते. यावरून लस उत्पादक कंपन्यांवर टीकही करण्यात आली होती.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
या पार्श्वभूमीवर कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन्ही लसींच्या किमती राज्यांसाठी आता कमी करण्यात आल्या आहेत.