मन की बात-नरेंद्र मोदी: 'कोरोना आपल्या सर्वांच्या संयमाची परीक्षा पाहत आहे'

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Twitter

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एप्रिल महिन्यातील मन की बात कार्यक्रमाचं प्रसारण आज होणार आहे. देशभरात कोरोनाची दुसरी लाट थैमान घातल आहे.

रोज 3 लाखांपेक्षाही जास्त कोरोनाबाधित रुग्ण देशात आढळून येत आहेत. या परिस्थितीचा ताण आरोग्य व्यवस्थेवर येत असल्याचं सध्या चित्र आहे.

देशात सर्वच भागातून ऑक्सिजन, बेड, व्हेंटीलेटर, रेमडेसिवीर औषध यांच्या तुटवड्याच्या बातम्या येत आहेत.

या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यंदाच्या मन की बातमध्ये कोणत्या मुद्द्यांवर चर्चा करतो, हे पाहणं महत्त्वांचं आहे.

गेल्या आठवड्यात दिनांक 20 एप्रिल रोजी नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधून एक भाषण केलं होतं. राज्यांनी लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय समाजावा, असं नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी म्हटलं होतं.

दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळा औपचारिक पद्धतीनेच साजरा करावा, असं आवाहनही मोदींनी केलं. तसंच त्यांनी आपला पश्चिम बंगाल दौरा रद्द करून मुख्यमंत्र्यांसोबत एक बैठकही घेतली होती.

या सर्व घडामोडी पाहता नरेंद्र मोदी यांच्या मन की बातकडे सर्वांचं लक्ष आहे.

मन की बातमध्ये मांडलेले महत्त्वाचे महत्त्व

कोरोना आपली कसोटी पाहत आहे. आपली माणसं अकाली सोडून गेली आहेत. पहिल्या लाटेत आपण कोरोनावर मात केली. मात्र दुसऱ्या लाटेत तो आपल्याला त्रास देतो आहे.

माझी विविध क्षेत्रातील जाणकारांशी माझी चर्चा झाली. त्यांनी अनेक सूचना केल्या. केंद्रासह विविध राज्य सरकार योगदान देत आहेत. आरोग्य कर्मचारी अथक लढत आहेत.

डॉ. शशांक जोशी काय म्हणाले?

मन की बातमध्ये महाराष्ट्र टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी पंतप्रधानांशी संवाद साधला. त्यात त्यांनी सांगितले की, "दुसरी लाट वेगवान पद्धतीने आली आहे. मृत्यूदर कमी आहे. तरुण मुलांमध्येही लक्षणं आढळत आहेत. चव आणि गंध जाणं अशीही लक्षणं आहेत. 80 टक्के लोकांमध्ये कोणतीही लक्षणं नाहीत. म्युटेशन होत असतात. जसे आपण कपडे बदलतो तसं व्हायरस त्याचं स्वरूप बदलतो."

हलकी लक्षणं, मध्यम आणि तीव्र लक्षणं. हलक्या लक्षणांसाठी ताप, ऑक्सिजन आणि नाडीचे ठोके तपासावेत. पॅरासिटामोल डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावी. मध्यम लक्षणांसाठी डॉक्टरांशी संपर्क करावा. छोटे उपाय आहेत. रेमडेसीवीर ही प्रायोगिक स्वरुपाचं औषध आहे.

यामुळे हॉस्पिटलमधलं वास्तव्य कमी होऊ शकते. ज्यांना ऑक्सिजन लागतो त्यांच्यासाठीच हे औषध आहे. प्राणायाम केलं, फुप्फुसांचा व्यायाम केला तर मदत होऊ शकते. जगातले सगळ्यात उत्तम उपचार देशात उपलब्ध आहेत. रिकव्हरी रेट चांगला आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)