You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
IPL 2021: संजू सॅमसनचा शतकी तडाखा व्यर्थ; पंजाबचा थरारक विजय
नवीन कर्णधार संजू सॅमसनच्या तडाखेबंद शतकी खेळीच्या बळावर राजस्थान रॉयल्सने विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले मात्र अखेरीस पंजाब किंग्जने 4 धावांनी विजय मिळवला.
पंजाबने 221 धावांचा डोंगर उभारला. संजू सॅमसनच्या 119 धावांच्या अफलातून शतकी खेळीच्या जोरावर राजस्थानने आटोकाट प्रयत्न केला मात्र त्यांना 217धावांपर्यंतच मजल मारता आली.
कर्णधारपदाच्या अतिरिक्त जबाबदारीचं दडपण झुगारून देत संजू सॅमसनने शतक झळकावलं. आयपीएल स्पर्धेत कर्णधारपदाच्या पदार्पणात शतक झळकावणारा संजू पहिलाच खेळाडू आहे.
संजूने केवळ 54 चेंडूत शतक पूर्ण केलं. शेवटच्या ओव्हरमध्ये राजस्थानला 13 धावांची आवश्यकता होती.
पाचव्या चेंडूवर एकेरी धाव न घेण्याचा निर्णय संजूने घेतला. त्यामुळे अखेरच्या चेंडूवर 5 धावा असं समीकरण होतं. संजूने अर्शदीपचा चेंडू टोलवला मात्र दीपक हुडाने झेल टिपला. संजूने 12 चौकार आणि 7 षटकारांची लयलूट करताना 63 चेंडूत 119 धावांची वादळी खेळी केली. संजूला या अविश्सनीय खेळीदरम्यान 12 आणि 35 वर असताना जीवदान मिळालं होतं.
कर्णधारपदाच्या अतिरिक्त जबाबदारीचं दडपण झुगारून देत संजू सॅमसनने झुगारून देत शतकाला गवसणी घातली. आयपीएल स्पर्धेत कर्णधारपदाच्या पदार्पणात शतक झळकावणारा संजू पहिलाच खेळाडू आहे.
आयपीएल स्पर्धेतलं संजूचं हे तिसरं शतक आहे. याआधी 2017 मध्ये त्याने दिल्ली डेअरडेव्हिल्ससाठी खेळताना संजूने पुण्याविरुद्ध पुण्यातच 102 धावांची खेळी केली
2019 मध्ये राजस्थान रॉयल्ससाठी खेळताना संजूने हैदराबादविरुद्ध हैदराबाद इथे नाबाद 102 धावांची खेळी केली होती.
पंजाब किंग्जने दीपक हुडाच्या 28 चेंडूत 64 धावांची खेळी केली. त्याने चार चौकार आणि सहा षटकारांची आतषबाजी केली. कर्णधार राहुलने 50चेंडूत 91 धावांची खेळी केली. यामध्ये 7 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)