पुणे लॉकडाऊन : नियमांचं पालन केलं नाही तर 2 एप्रिलला कठोर निर्णय घेऊ - अजित पवार

BBC/ SharadBadhe

फोटो स्रोत, BBC/ SharadBadhe

Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

पुणेकरांनी नियमांचं काटेकोर पालन केलं नाही, तर मात्र पुण्यात 2 एप्रिलला कठोर घेऊ असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.

पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात एक पत्रकार परिषद घेऊन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाय योजनांची माहिती दिली.

त्यानुसार, 1 एप्रिलपासून पुण्यातील सर्व खासगी कार्यक्रम बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसंच 50 पेक्षा अधिक संख्या लग्नाला उपस्थित नको, असं आवाहन करण्यात आलं आहे.

यावेळी इतर नियमांची माहिती अजित पवार यांनी दिली,

  • 20 लोकांमध्ये अंतविधी करावेत.
  • शाळा महाविद्यालय 31 एप्रिल पर्यंत बंद राहणार.
  • संध्याकाळी सर्व बाग बंद राहणार.
  • जम्बो कोव्हिडमधील सुविधा वाढवण्याचा निर्णय.
  • पिंपरीचं जम्बो कोव्हिट सेंटर सुद्धा सुरू करणार.
  • ससून रुग्णालयातील बेडची संख्या 300 वरून 500 बेडपर्यंत वाढवणार.
  • बोर्डाच्या परीक्षा मात्र ठरल्याप्रमाणेच होणार आहेत.
  • सामूहिक होळी साजरी न करण्याचं आवाहन
  • संख्या कमी झाली नाही तर पुढच्या बैठकीत हॉटेल बंद करावे लागतील.
  • MPSC परीक्षा वेळेतच होणार.

तसंच पुढच्या शुक्रवारी आढावा घेऊन लॉकडाऊन बाबत निर्णय घेण्यात येईल, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. संख्या कमी झाली नाही तर नाइलाजास्तव लॉकडाऊन करावा लागेल, असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.

जिथे कोरोनाबधितांची संख्या जास्त आहे तिथे जास्त लसीचे डोस द्यायला पाहिजेत, अशी मागणी अजित पवार यांनी केंद्राकडे केली आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)