You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तेलंगणा: राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा सुरू असताना स्टॅंड कोसळले, अनेक जण जखमी
तेलंगणातील सूर्यापेट येथे कबड्डी सामन्यादरम्यान प्रेक्षकांचे स्टॅंड कोसळल्याने अनेक जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमींपैकी 20 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे बीबीसी तेलुगुने म्हटले आहे.
47 व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या सामन्यावेळी प्रेक्षकांचे स्टॅंड अचानक कोसळले, त्यामुळे अनेक जण त्या खाली दबले गेले.
क्षमतेपेक्षा अधिक लोक स्टॅंडमध्ये बसल्यामुळे हा अपघात झाला असावा असं पोलिसांनी सांगितले आहे.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकांनी शेअर केला आहे.
बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असल्याचे सूर्यपेटच्या पोलीस अधीक्षकांनी न्यूज एजन्सीजला सांगितले आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)