You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रंजन गोगोई : माजी सरन्यायाधीशांविरोधातील लेंगिक शोषणाचं प्रकरण सुप्रीम कोर्टाकडून रद्दबातल
माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याविरोधातील लैंगिक शोषणाचं प्रकरण सुप्रीम कोर्टाकडून रद्दबातल करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, कोर्टाने हे प्रकरण स्वतःच 'स्यू मोटो' स्वरुपात दाखल करून घेतलं होतं. आता हे प्रकरण कोर्टानेच रद्दबातल करून टाकलं आहे.
सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती संजय किशन कौल यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर आज (गुरुवार, 18 फेब्रुवारी) याप्रकरणी सुनावणी झाली.
"स्यू मोटो स्वरुपात दाखल करून घेण्यात आलेलं हे प्रकरण आम्ही आता रद्दबातल करत आहोत," असं न्यायमूर्ती संजय किशन कौल यावेळी म्हणाले.
काय आहे प्रकरण?
माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर त्यांच्याच कार्यालयात ज्युनिअर असिस्टंट म्हणून काम केलेल्या महिलेने लैंगिक छळाचा आरोप केला होता. कोर्टाच्या 22 न्यायमूर्तींनी याप्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली होती.
याप्रकरणी चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी घेतला होता.
संबंधित महिलेच्या मागणीवरून सर्वोच्च न्यायालयाने कोर्टाच्या 'अंतर्गत चौकशी समिती'हून (इंटरनल कम्प्लेंट्स कमिटी) वेगळी अशी विशेष समिती स्थापन करण्यात आली होती. ही समिती कायद्यातल्या अनेक नियमांचं पालन करू शकत नाही. त्यावरूनही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत होते.
अखेर, संजय किशन कौल यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हे प्रकरण आता रद्दबातल केलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)