IndvsEng : भारताचा इंग्लंडवर विजय, आर. अश्विनची अष्टपैलू कामगिरी

अश्विन

फोटो स्रोत, SAEED KHAN

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

चेन्नईतल्या चिदंबरम स्टेडियमवर खेळण्यात येत असलेल्या भारत आणि इंग्लंडमधल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताची विजयाकडे वाटचाल सुरू आहे.

मॅचच्या तिसऱ्या दिवशी काल (15 फेब्रुवारी) आर अश्विनने शतकी खेळी केली होती. भारताने इंग्लंडसमोर 482 धावांचं आव्हान ठेवलंय.

चौथ्या दिवसाच्या खेळामध्ये इंग्लंडच्या आतापर्यत 5 विकेट्स गेलेल्या आहेत. अक्षर पटेल आणि आर. अश्विन यांच्या फिरकीने पाहुण्यांना कठीण परिस्थितीत आणलंय.

अक्षर पटेलने 2 विकेट्स घेतल्या, तर अश्विनने 3 विकेट्स घेतल्या आहेत.

इंग्लंडचा कर्णधार जो रूट आता इंग्लंडचा डाव सावरतो का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

पहिल्या टेस्ट मॅचमध्ये जो रूटच्या शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने सामना जिंकला होता.

भारत-इंग्लंड

फोटो स्रोत, STU FORSTER

भारतातर्फे काल(सोमवार) अश्विननं घरच्या मैदानात खेळताना इंग्लंडविरुद्धच्या या सामन्याच्या दुसऱ्या डावात शतक ठोकलं. त्यानं 148 चेंडूंमध्ये 14 चौकार आणि एका षटकारासह 106 धावांची खेळी केली. कसोटी क्रिकेटमधलं त्याचं हे पाचवं शतक आहे.

त्याआधी पहिल्या डावात भारताचा सलामीवर रोहित शर्मानं शतक ठोकलं होतं. रोहितच्या 161, अजिंक्य रहाणेच्या 67 आणि ऋषभ पंतच्या नाबाद 58 धावांच्या खेळीमुळे भारताला पहिल्या डावात 329 धावा करता आल्या.

पण पहिल्या इनिंगमध्ये शुभमन गिल, विराट कोहली, ईशांत शर्मा आणि कुलदीप यादव भोपळाही न फोडता माघारी परतले होते. मग इंग्लंडचा पहिला डावही 134 धावांत गडगडला होता. पहिल्या डावात अश्विननं चार तर अक्षर पटेलनं तीन विकेट्स काढल्या होत्या.

या चेन्नई कसोटीवर स्पिनर्सचं वर्चस्व राहिलेलं आहे. इंग्लंडकडून डावखुरा फिरकी गोलंदाज जॅक लीच आणि ऑफस्पिनर मोईन अलीनं प्रत्येकी चार विकेट्स घेतल्या आहेत.

आर. अश्विन आणि अक्षर पटेल या स्पिनर्सनेही काल इंग्लंडच्या 3 विकेट्स घेत पाहुण्या संघाची बिकट अवस्था केली.

ISWOTY

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)