अर्जुन तेंडुलकरच्या यॉर्करने जेव्हा इंग्लंडच्या बॅट्समनमनला जेरीस आणलं होतं...

फोटो स्रोत, ISHARA S. KODIKARA
- Author, पराग फाटक
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने आपल्या पहिल्याच रणजी मॅचमध्ये शतक केलं आहे.
गोव्याकडून राजस्थानविरोधात खेळताना अर्जुनने 177 चेंडूंमध्ये आपलं शतक पूर्ण केलं. अशाप्रकारे त्याने त्याचे वडील सचिन तेंडुलकरच्या रणजी पदार्पणाच्या सामन्यात झळकावलेल्या शतकाच्या विक्रमाची बरोबरी केली.
एस प्रभूदेसाईसोब त्यानं भागीदारी केली. दोघांनी केलेल्या बॅटिंगमुळे गोव्याला 400 धावांचा पल्ला गाठता आला.
सचिन तेंडुलकरनेही 1988 साली आपल्या पहिल्या रणजी मॅचमध्ये शतक झळकवलं होतं. सोशल मीडियावरही अनेक जण अर्जुनच्या या शतकाची तुलना सचिनच्या शतकासोबत करत आहेत.
या वर्षाच्या सुरूवातीलाच अर्जुनने गोव्याकडून खेळायला सुरूवात केली होती. मुंबईच्या टीमकडून खेळण्याची संधीच त्याला मिळाली नाही.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
अर्जुन आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स टीमचा भाग आहे, पण तो कधीही प्लेइंग इलेव्हन टीममध्ये नव्हता.
मुंबईतल्या वेगवेगळ्या वयोगटातील स्पर्धेत तो खेळला आहे. भारतीय संघाच्या सरावादरम्यान नेट्समध्ये दिसला आहे. श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या भारताच्या U19 संघातही त्याने स्थान पटकावलं होतं.
अर्जुन डावखुरा फास्ट बॉलर आहे. उंचपुरा अर्जुन स्विंग बॉलिंगसाठी प्रसिद्ध आहे. अर्जुन उपयुक्त बॅटिंगही करतो.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो स्रोत, Getty Images
अर्जुनने पुणेस्थित कोच आणि बायोमेकॅनिक्स तज्ज्ञ अतुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं. दोन स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे अर्जुनला अॅक्शनमध्ये काही बदल करावे लागले. अतुल नॅशनल क्रिकेट अकादमीबरोबरही काम करतात.
भारताचे माजी फास्ट बॉलर आणि कोच सुब्रतो बॅनर्जी यांचं मार्गदर्शनही अर्जुनला लाभलं आहे. देशातल्या अव्वल प्रशिक्षकांमध्ये सुब्रतो यांचं नाव घेतलं जातं. रणजी करंडक विजेत्या विदर्भ संघाचं प्रशिक्षकपद त्यांनी सांभाळलं आहे.
अर्जुनची कामगिरी
अर्जुनने भारतीय U19 आणि मुंबई U19 संघांचं प्रतिनिधित्व केलं आहे. काही दिवसांपूर्वीच सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-20 स्पर्धेत मुंबईच्या वरिष्ठ संघात अर्जुनचं पदार्पण झालं.
हरयाणाविरुद्धच्या मॅचमध्ये अर्जुनने एक विकेट मिळवली. त्याच्या तीन ओव्हर्समध्ये 34 रन्स कुटण्यात आल्या.
पुद्दुचेरीविरुद्धच्या मॅचमध्ये अर्जुनने 33 रन्सच्या मोबदल्यात एक विकेट पटकावली.

फोटो स्रोत, DANIEL LEAL-OLIVAS
मुंबई U19 संघातर्फे खेळताना 2017-18 हंगामात कूचबिहार करंडक स्पर्धेत 19 विकेट्स पटकावल्या होत्या.
2017 मध्ये बडोदा इथे झालेल्या जयंत लेले निमंत्रितांच्या स्पर्धेत अर्जुनने चांगली कामगिरी केली होती.
क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या इनडोअर अकादमीत सरावाची संधी अर्जुनला मिळाली आहे. इंग्लंड संघ सराव करत असताना अर्जुनने बॉलिंग केली आहे.
दक्षिण आफ्रिका संघाविरुद्धच्या मालिकेसाठी इंग्लंडचे बॅट्समन सराव करत होते. अर्जुनच्या बुंध्यात पडलेल्या यॉर्करवर इंग्लंडचा बॅट्समन आणि विकेटकीपर जॉनी बेअरस्टो दुखापतग्रस्त होता होता वाचला.
अर्जुनच्या वेगाने आणि अचूकतेने बेअरस्टोसह इंग्लंड संघातील खेळाडू प्रभावित झाले होते.
गेल्या वर्षी लॉर्ड्स इथे भारतीय महिला क्रिकेट संघ सराव करत असताना अर्जुनने बॉलिंग केली होती.
भारतीय संघ आंतरराष्ट्रीय सामन्यानिमित्ताने मुंबईत असतो तेव्हा अर्जुन नेट बॉलर म्हणून सरावादरम्यान दिसतो.

फोटो स्रोत, ISHARA S. KODIKARA
2018मध्ये अडलेड इथे झालेल्या सामन्यात अर्जुन, क्रिकेट क्लब ऑफ इंडिया संघातर्फे हाँगकाँगच्या एका संघाविरुद्ध खेळला. त्या सामन्यात अर्जुनने 27 बॉलमध्ये 48 रन्सची खेळी केली होती.
2017 मध्ये अर्जुन मेरलीबोन क्रिकेट संघाचा भाग होता. मेरलीबोन क्रिकेट संघाने नामिबियाच्या U19संघाविरुद्ध काही सामने खेळले होते.
इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघासाठी नेट बॉलर म्हणून बॉलिंग केली आहे. काही महिन्यांपूर्वी दुबईत झालेल्या आयपीएलच्या 13व्या हंगामादरम्यान अर्जुन मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दिसला होता.
दोन वर्षांपूर्वी मुंबईतील ट्वेन्टी-20 लीगच्या लिलावात अर्जुनला आकाश टायगर्स संघाने 5 लाख खर्चून ताफ्यात समाविष्ट केलं होतं.
नेपोटिझमवरुन का झालं होतं ट्रोलिंग?
काही महिन्यांपूर्वी आयपीएलचा तेरावा हंगाम दुबईत सुरू होता. त्यावेळी मुंबई इंडियन्सच्या राहुल चहरने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. यामध्ये मुंबई इंडियन्सचे काही खेळाडू स्विमिंग पूलमध्ये दिसत होते.
या फोटोत ट्रेंट बोल्ट, जेम्स पॅटिन्सन, सौरभ तिवारी, मोहसीन खान, युधवीर सिंग चरक यांच्यासह अर्जुन तेंडुलकर दिसत होता. अर्जुन तेंडुलकर नेट बॉलर म्हणून मुंबई इंडियन्सचा भाग होता. मात्र या फोटोत तो दिसल्यानंतर हे नेपोटिझम असल्याची टीका करण्यात आली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
अर्जुनचे वडील सचिन तेंडुलकर अनेक वर्ष मुंबई इंडियन्सचा संघाचा भाग होते. निवृत्ती घेतल्यानंतर सचिन मुंबई इंडियन्सच्या कोचिंग टीमचा भाग आहेत. मुंबई इंडियन्स वेबसाईटनुसार सध्या सचिन तेंडुलकर संघाचे 'आयकॉन' आहेत. सचिनमुळे अर्जुनला संधी मिळाली आहे असं ट्रोलकर्त्यांचं म्हणणं होतं.
'अर्जुन काम कर'
तीन वर्षांपूर्वीचा हा किस्सा आहे. भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर होता. त्यावेळी अर्जुन लॉर्ड्सस्थित मेरलीबोन क्रिकेट क्लबतर्फे खेळण्याच्या निमित्ताने तिथे होता. लॉर्ड्स टेस्टदरम्यान पावसामुळे खेळ थांबला तेव्हा अर्जुन मैदानातल्या कर्मचाऱ्यांना मदत करताना दिसला होता. नेट्समध्ये त्याने विराट कोहली आणि मुरली विजय यांना बॉलिंग केली होती.
दुसऱ्या दिवशीच्या खेळानंतर लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंड मॅनेजमेंटने अर्जुनचं कौतुक केलं होतं. केवळ सराव नव्हे तर अर्जुनने ग्राऊंडस्टाफला मदत केली.
या प्रसंगाचा संदर्भ देत इंग्लंडची महिला क्रिकेटपटू आणि अर्जुनची मैत्रीण डॅनियल व्हॅटने त्याला गंमतीत ट्रोल केलं. पावसामुळे खेळ थांबला होता तेव्हा व्हॅट मैदानात होती. तिने इन्स्टाग्रामवर व्हीडिओ शेअर केला आणि 'अर्जुन काम कर' अशी कॅप्शनही टाकली.
सिक्स पॅक अॅब आणि मतदानाचा हक्कही बजावला
गेल्या वर्षी अर्जुनने पिळदार शरीरयष्टी अर्थात सिक्स पॅक अब दाखवणारा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगलं खेळण्याइतकंच शरीर फिट असणं आवश्यक आहे.
अर्जुनने फिट शरीराचं उदाहरण या व्हीडिओद्वारे शेअर केलं होतं. अर्जुनच्या या इन्स्टा स्टोरीची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली होती.

फोटो स्रोत, Hindustan Times
सज्ञान झाल्यानंतर अर्जुनने नियमितपणे मतदानाचा हक्क बजावला आहे. युवा वर्गाला मतदानासाठी प्रेरित करणं अवघड मानलं जातं. मात्र अर्जुन घरच्यांबरोबर मतदानाचा हक्क बजावताना दिसला आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























