AusVsInd: टीम इंडिया हरली पण या भारतीय माणसाने प्रेम जिंकलं!

भारत, ऑस्ट्रेलिया, कोहली, स्मिथ

फोटो स्रोत, Twitter/ICC

फोटो कॅप्शन, स्टीव्हन स्मिथने वेगवान शतक झळकावलं.
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

तडाखेबंद बॅटिंगच्या बळावर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या वनडेत भारताला नमवत तीन सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी घेतली. टीम इंडियाला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. मात्र मैदानात बसून मॅच पाहणाऱ्या एका भारतीय माणसाने आपल्या प्रेमिकेचं प्रेम जिंकलं आहे.

सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर सुरू असलेल्या या मॅचमध्ये कोरोना कारणास्तव मर्यादित प्रेक्षकांना प्रवेश देण्यात आला. ऑस्ट्रेलियाच्या इनिंग्जदरम्यान, 20व्या ओव्हरवेळी एका भारतीय माणसाने आपल्या ऑस्ट्रेलियन गर्लफ्रेंडला स्टेडियमध्ये प्रपोज केलं.

भारतीय माणूस गुडघ्यावर बसला आणि त्याने प्रेमिकेला अंगठी सादर केली. आश्चर्याने अवाक झालेल्या प्रेमिकेने 'हो' म्हटलं. दोघांनी एकमेकांना मिठी मारली. चुंबनही घेतलं. संपूर्ण मैदानाने या प्रेमकहाणीला तथास्तु म्हणत शुभेच्छा दिल्या.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

जायंट स्क्रीनवर हे प्रपोजल दिसल्याने खेळाडूंनीही त्याला दाद दिली. ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने टाळ्या वाजवून दांपत्याला शुभेच्छा दिल्या.

टीम इंडियाला पराभवाला सामोरं जावं लागलं असलं तरी या भारतीय माणसाने भल्यामोठ्या स्टेडियममध्ये प्रेमिकेला प्रपोज करत तिचं मन जिंकलं आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हा व्हीडिओ शेअर केल्यानंतर जगभरातील नेटिझन्सच्या उत्साहाला उधाण आलं. प्रपोज करण्याची जागा आणि वेळ किती भारी आहे या आशयाच्या असंख्य प्रतिक्रिया या व्हीडिओवर आल्या.

क्रिकेट

फोटो स्रोत, Screen Grab

सिडनीत झालेल्या दुसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियाने स्टीव्हन स्मिथच्या शतकाच्या बळावर 389 रन्सचा डोंगर उभारला. टीम इंडियाने प्रत्युतर देण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना 338 रन्सपर्यंतच मजल मारता आली.

ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून बॅटिंग घेतली आणि पहिल्या वनडेप्रमाणेच भारतीय बॉलर्सचा खरपूस समाचार घेतला. डेव्हिड वॉर्नर आणि आरोन फिंच जोडीने 142 रन्सची खणखणीत सलामी दिली. फिंच 60 रन्स करून बाद झाला. शतकाकडे कूच करणारा वॉर्नर श्रेयस अय्यरच्या थ्रोची शिकार ठरला. त्याने 83 रन्सची खेळी केली.

स्टीव्हन स्मिथ आणि मार्नस लबूशेन यांनी तिसऱ्या विकेटसाठी 136 रन्सची भागीदारी केली. कुठलेही अनोखे फटके न खेळताही आक्रमक खेळता येतं याचा वस्तुपाठ सादर करताना स्मिथने शतकी खेळी साकारली.

स्मिथने कारकीर्दीतल्या शतकाची नोंद केली. त्याने 14 चौकार आणि 2 षटकारांसह 64 बॉलमध्येच 104 रन्सची खेळी केली.

भारत, ऑस्ट्रेलिया, कोहली, स्मिथ

फोटो स्रोत, Twitter/ICC

फोटो कॅप्शन, ग्लेन मॅक्सवेल

स्मिथ बाद झाल्यावर लबूशेनला ग्लेन मॅक्सवेलची साथ मिळाली. स्फोटक बॅटिंगसाठी प्रसिद्ध मॅक्सवेलने 29 बॉलमध्ये 4 चौकार आणि 4षटकारांसह नाबाद 63 रन्सची वेगवान खेळी केली. लबूशेनने नाबाद 70 रन्स केल्या.

ऑस्ट्रेलियाने 389 रन्सचा डोंगर उभारत टीम इंडियाला डोंगराएवढं लक्ष्य दिलं.

टीम इंडियासाठी शिखर धवन आणि मयांक अगरवाल यांनी 58 रन्सची सलामी दिली. मात्र यानंतर दोघेही झटपट बाद झाले. विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी डाव सावरला. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी 93 रन्सची भागीदारी केली. श्रेयस बाद झाल्यानंतर कोहलीने राहुलला हाताशी घेत चौथ्या विकेटसाठी 72 रन्स जोडल्या.

भारत, ऑस्ट्रेलिया, कोहली, स्मिथ

फोटो स्रोत, Twitter/ICC

फोटो कॅप्शन, ऑस्ट्रेलियाने भारतीयांच्या तुलनेत शिस्तबद्ध गोलंदाजी केली.

जोश हेझलवूडने कोहलीला बाद करत भागीदारी फोडली. राहुल आणि हार्दिक पंड्या जोडीने पाचव्या विकेटसाठी 63 रन्स जोडत अशक्य विजयाच्या आशा पल्लवित ठेवल्या. मात्र राहुल आणि हार्दिक बाद होताच ऑस्ट्रेलियाचा विजय सुकर झाला.

कोहलीने 89 तर राहुलने 76 रन्सची खेळी केली. पॅट कमिन्सने 3 तर हेझलवूड आणि झंपा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

वॉर्नर दुखापतग्रस्त

भारताच्या डावादरम्यान फिल्डिंग करताना ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर दुखापतग्रस्त झाला. फिल्डिंग करताना वॉर्नरने डाईव्ह मारली. या प्रयत्नात त्याला दुखापत झाली. दुखापत गंभीर असल्याने तो मैदानाबाहेर गेला. एक्स रे चाचणीनंतर वॉर्नरच्या दुखापतीचं स्वरुप स्पष्ट होईल. वॉर्नर ऑस्ट्रेलियाच्या ट्वेन्टी-20 आणि टेस्ट संघाचा अविभाज्य भाग आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)