You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
निर्मला सीतारमणः नव्या नोकऱ्या निर्माण होण्यासाठी आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेची घोषणा
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नव्या नोकऱ्या निर्माण होण्यासाठी आत्मनिर्भर भारत 3 योजनेची घोषणा केली. याअंतर्गत आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेचीही घोषणा केली. आजच्या पत्रकार परिषदेत निर्मला सीतारमण आणि अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी 12 नव्या घोषणा केल्या.
EPFO अंतर्गत नोंदवलेल्या संस्थांमध्ये 15 हजाराखाली पगार असणाऱ्या नव्या कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. त्याचप्रमाणे कोव्हिडच्या काळात नोकरी गेलेल्या लोकांनाही याचा फायदा होणार आहे. तसेच ही योजना 1 ऑक्टोबर 2020 पासून लागू होईल.
ही योजना जून 2021 पर्यंत अंमलात असेल. नव्या कर्मचाऱ्यांना याद्वारे सबसिडी केंद्र सरकारकडून मिळणार आहेत. 1000 पेक्षा कमी कर्मचारी असणाऱ्या कंपन्यांतील कर्मचारी आणि नोकरी देणारे यांच्या कर्मचारी निर्वाह भत्त्यातील प्रत्येकी 12 टक्के रक्कम सरकारकडून देण्यात येईल. तर 1000 पेक्षा जास्त कर्मचारी असणाऱ्या कंपन्यांतील कर्मचाऱ्यांच्या निर्वाह भत्त्यातील 12 टक्के रक्कम सरकार देईल.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)