एकनाथ खडसे यांच्या कारला अपघात, खडसेंसह सर्वजण सुखरूप #5मोठ्याबातम्या

एकनाथ खडसे

फोटो स्रोत, facebook

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया

1. एकनाथ खडसे यांच्या गाडीला अपघात, खडसेंसह सर्वजण सुखरुप

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या कारला अपघात झाला आहे. खडसेंच्या कारचे टायर फुटून जळगावमध्ये हा अपघात झाला. या अपघातात खडसे सुखरुप असून गाडीतील कोणालाही दुखापत झालेली नाही. टीव्ही9 मराठीनं ही बातमी दिली आहे.

रविवारी (1 नोव्हेंबर) अमळनेर येथील कार्यक्रम आटोपून जळगावकडे येत असताना एकनाथ खडसे यांच्या कारला अपघात झाला. खडसेंच्या कारचे टायर फुटले, मात्र चालकाने प्रसंगावधान दाखवत कारवर नियंत्रण मिळवलं.

याविषयी माहिती देताना खडसे यांनी ट्वीट केलं, "अमळनेरहून जळगावकडे येतांना धरणगाव नजिक माझ्या गाडीला किरकोळ अपघात झाला. गाडीचा वेग कमी असल्याने आणि चालकाच्या प्रसंगावधानाने आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं आम्ही सर्व सुखरूप आहोत. कोणालाही इजा झालेली नाही."

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

याआधी एकनाथ खडसे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत एकाच गाडीने नंदुरबार दौरा पूर्ण केला. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे अनिल देशमुख यांच्या हस्ते श्री नारायण मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळेस गृहमंत्र्यांसोबत एकनाथ खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

2. गिलगिट-बाल्टिस्तान आमचा अविभाज्य घटक- भारत

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या निर्णयाला भारतानं विरोध दर्शवला आहे. गिलगिट-बाल्टिस्तानला पाकिस्ताननं प्रांताचा दर्जा दिला आहे. भारतानं या निर्णयाला विरोध करत म्हटलं, पाकिस्ताननं घटनाबाह्यरीत्या हा दर्जा दिला आहे. त्यांनी गिलगिट-बाल्टिस्तान रिकामं करावं. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

परराष्ट्र मंत्रालय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्त म्हणाले, "पाकिस्तानने बेकायदेशीर आणि जबरदस्तीने भारताच्या भूभागावर अतिक्रिमण केलं आहे. हे भारत कधीच स्वीकारणार नाही. जम्मू-काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशासह गिलगिट-बाल्टिस्तान हा भारताचा अविभाज्य भाग आहे."

3. जीएसटीचं 1 लाख कोटी रुपयांचं संकलन

आठ महिन्यांत पहिल्यांदाच वस्तू व सेवा कराचे (जीएसटी) एक लाख कोटींहून अधिक संकलन झाले आहे. टाईम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिली आहे.

केंद्रीय अर्थसचिव अजयभूषण पांडे यांना सांगितल्यानुसार, 72,828 कोटी रुपये एवढे जास्त कर संकलन एप्रिलच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये झाले आहे. या महिन्यात नवरात्रौत्सव असल्याने खरेदी वाढलेली पाहायला मिळाली. त्यामुळे करसंकलन वाढले आहे.

gst

फोटो स्रोत, Getty Images

फेब्रुवारीपासूनच्या आठ महिन्यांत जीएसटीचे संकलन प्रथमच 1 लाख कोटींपेक्षा अधिक झाले. ऑक्टोबरमध्ये जीएसटीचे संकलन 1 लाख 5 हजार 155 कोटी रुपये एवढे झाले आहे. सलग दुसऱ्या महिन्यात जीएसटी संकलनात वाढ नोंदवली गेली, असंही अजयभूषण पांडे यांनी सांगितलं आहे.

4. ऊसदराचा निर्णय आता राज्य सरकारकडे

कारखानानिहाय ऊसाचे दर निश्चित करण्याचे आधिकार आता यापुढे राज्यांना असणार आहेत. याबाबतचा निर्णय नुकताच केंद्र सरकारच्या खाद्य आणि सार्वजनिक विभागाने घेतला आहे.

उस

फोटो स्रोत, Getty Images/SAM PANTHAKY

यापूर्वी हे दर केंद्र सरकार निश्चित करत होते. या निर्णयावर साखर उद्योगातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

5. तेजस्वी यादव यांच्या एका दिवसात 19 सभा

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी उर्वरित दोन टप्प्यात मतदान होणाऱ्या मतदारसंघातमध्ये झोकून दिलं आहे. एनडीएकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीश कुमार यांच्यासह भाजपा-जदयूचे दिग्गज नेते प्रचारासाठी मैदानात उतरलेले असताना महाआघाडीकडून तेजस्वी यादव यांनी प्रचार सभांचा धडाका लावला आहे.

तेजस्वी यादव, लालूप्रसाद यादव, आरजेडी, बिहार, आयपीएल, दिल्ली डेअरडेव्हिल्स

फोटो स्रोत, Hindustan Times

फोटो कॅप्शन, तेजस्वी यादव

तेजस्वी यादव यांनी लालू प्रसाद यादव यांच्या सभांचाच विक्रम मोडीत काढला.

लालू प्रसाद यादव यांनी एका दिवसात 16 प्रचारसभा केल्याचा विक्रम आहे. त्यांचा हा विक्रम तेजस्वी यादवांनी मोडला आहे. तेजस्वी यादव यांनी शनिवारी (31 ऑक्टोबर) 17 प्रचारसभा आणि 2 रोड शो करत एका दिवसात तब्बल 19 प्रचारसभा घेतल्या.

NDTVनं ही बातमी दिली आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.' रोज रात्री 8 वाजता बीबीसी मराठीचे कोरोना पॉडकास्ट तुम्ही फेसबुकवर पाहू शकता.)