देवेंद्र फडणवीस कोरोनावरील उपचारांसाठी सरकारी रुग्णालयात दाखल

फोटो स्रोत, Devendra Fadnavis/facebook
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे.
मला कोरोनाची लागण झाली, तर सरकारी दवाखान्यात दाखल करा, असं फडणवीसांनी काही महिन्यांपूर्वी भाजप नेते गिरीश महाजन यांच्याशी बोलताना म्हटलं होतं.
फडणवीस-महाजन यांच्या फोनवरील संभाषणाची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यानंतर खुद्द महाजनांनीच अशी बातचित झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता.
कोरोनावरील उपचारांसाठी देवेंद्र फडणवीस मुंबईतील सेंट जॉर्ज या सरकारी रुग्णालयातच दाखल झाले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
दरयान, आपल्याला कोरोना झाल्याची माहिती त्यांनी स्वत: ट्वीट करून दिली.
आपल्या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं आहे, "लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी. माझी कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
"माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी. सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी," असंही त्यांनी म्हटलं आहे.
यापूर्वी महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
यामध्ये नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, महिला आणि बालकल्याण राज्यमंत्री बच्चू कडू, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, ऊर्जामंत्री नितीन राऊत, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जल वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, खासदार नवनीत राणा यांचा समावेश आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी ओला दुष्काळ पाहणी दौरा केला होता. बारामतीतून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली होती. पुणे, सोलापूर आणि उस्मानाबादमधील गावांना फडणवीसांनी भेटी दिल्या होत्या. त्यांनी बिहार निवडणुकीच्या निमित्ताने प्रचारदौरेही केले होते.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा )
























