कोरोना व्हायरस : जिम रविवारपासून उघडणार बेस्ट पूर्ण क्षमतेने धावणार

फोटो स्रोत, Getty Images
राज्य सरकारनं रविवारपासून म्हणजेच 25 ऑक्टोबरपासून जिम उघडण्यास परवानगी दिली आहे.
कंटेनमेंट झोन वगळून इतर भागातील व्यायामशाळांना मार्गदर्शक तत्वांनुसार सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
शनिवारपर्यंत आरोग्य विभागाकडून ही मार्गदर्शक तत्व जारी केली जाणार आहेत.
राज्य सरकारनं आज (23 ऑक्टोबर) त्या संदर्भातलं पत्रक जारी केलं आहे.
तसंच मुंबईतील बेस्ट बसेस पूर्ण क्षमतेने चालवण्याससुद्धा परवानगी देण्यात आली आहे.
जिम का बंद होत्या? शास्त्र काय सांगतं?
नॉटिंगहॅम विद्यापीठातील प्राध्यापक जोनाथन बॉल विषाणू संदर्भातील जाणकार आहेत.
व्यायाम करताना तुमच्या शरीराची मोठ्या प्रमाणावर हालचाल होते. तुमचा श्वासोच्छवास वेगाने होतो आणि तुम्ही खोल श्वास घेता असं प्राध्यापक बॉल यांनी सांगितलं.
त्यामुळे व्यायाम करताना ड्रॉपलेट्स म्हणजे शिंक किंवा बोलताना निघणारे तुषार बाहेर पडू शकतात. ते जिममधील अन्य व्यक्तींकडे पसरू शकतात. त्यातून त्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो.
जिममध्ये व्यायाम करताना अनेक उपकरणांना, वस्तूंना संपर्क केला जातो. चेहऱ्याला हात लावण्यापूर्वी या वस्तूंना स्पर्श केलेला असू शकतो. या माध्यमातून विषाणू पसरू शकतात.
पण यावर उपाय आहे.

फोटो स्रोत, Getty Images
जिममध्ये कोरोनाचा संसर्ग असलेला धोका काळजीपूर्वक कमी करता येऊ शकतो. प्रभावी वातानुकूलित यंत्रणा, सातत्याने सफाई, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन या गोष्टींद्वारे कोरोनाचा संसर्ग टाळता येऊ शकतो.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























