कोरोना लस विकसित करणाऱ्या डॉ. रेड्डीज कंपनीवर सायबर हल्ला

Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

कोरोनावरील लस विकसित करणारी औषधनिर्माण कंपनी डॉ. रेड्डीजनं सायबर हल्ला झाल्याची माहिती दिली आहे.

भारत, इंग्लंड, अमेरिका, रशिया आणि ब्राझील या देशांतील कंपनीची वेबसाईट हॅक करण्यात आल्याचं कंपनीनं म्हटलं आहे.

हा हल्ला रोखण्यासाठी कंपनीनं आपल्या सर्व डेटा सेंटर सेवा वेगळ्या केल्या असल्याचं कंपनीने सांगितलं.

गेल्या आठवड्यात डॉ. रेड्डीज या कंपनीला रशियाच्या स्पुटनिक-5 लशीच्या तिसऱ्या फेजमधील चाचण्या घेण्यास परवानगी देण्यात आली होती.

कोरोनाच्या लस उत्पादनावर या हल्ल्याचा परिणाम झाला आहे का, यावर बोलण्यास कंपनीनं नकार दिला आहे.

यूकेमधल्या यॉर्कशायर आणि कॅँब्रिजशायर इथल्या कंपनीच्या फोन लाईन बंद आहेत. पण, याचा हल्ला संबंध असल्याचं कंपनीनं म्हटलेलं नाहीये.

कंपनीचे मुख्य माहिती अधिकारी मुकेश राठी यांनी सांगितलं, "सायबर हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून आम्ही आम्ही सर्व डेटा सेंटर सेवा वेगळे केले आहेत.

"पुढच्या 24 तासांच्या आत सर्व सेवा सुरळीत होण्याची अपेक्षा करत आहोत आणि या घटनेमुळे आमच्या प्रक्रियेवर कोणताही मोठा परिणाम होण्याची शक्यता नाही."

भारतातील डॉ. रेड्डीजच्या लशीचं उत्पादनात अडथळा आल्याचं काही माध्यमांनी म्हटलं होतं.

डॉ. रेड्डीजची स्थापना 1986 मध्ये झाली आणि कंपनीचं हैदराबादला आहे. कंपनी आता गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, ऑन्कोलॉजी, वेदना व्यवस्थापन आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजार नष्ट करणारे 200हून अधिक उत्पादनं विकसित करत आहे.

गेल्या आठवड्यात भारतातील औषध नियामक मंडळानं कंपनीला प्राथमिक स्तरावर तिसऱ्या फेजची ट्रायल घेण्यास मान्यता दिली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)