You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुंबई पोलिसांची बँक खाती अॅक्सिस बँकेतून HDFC मध्ये वळवली
मुंबई पोलिसांच्या पगाराची खाती Axis बॅंकेतून HDFC बॅंकेत वळवण्याचा निर्णय मुंबई पोलिसांनी घेतलेला आहे.
HDFC बॅंकेने पोलीस दलासाठी आणि कुटुंबीयांसाठी चांगल्या सुविधा दिल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं वरिष्ठ अधिकार्यांनी सांगितलं आहे.
मुंबई पोलिसांच्या पगाराची खाती 2015 मध्ये Axis बॅंकेत उघडण्यात आली होती. मात्र Axis बॅंकेसोबतचा करार जुलै 2020 मध्ये संपला. त्यानंतर मुंबई पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.
मुंबई पोलिसांच्या पगाराची खाती HDFC बॅंकेत वळवण्याच्या निर्णयाची माहिती मुंबई पोलिसांच्या पोलीस नोटीसमध्ये देण्यात आल्याची माहिती, एका वरिष्ठ अधिकार्याने बीबीसीशी बोलताना दिली आहे.
राजकीय गोंधळ
2015 मध्ये मुंबई पोलिसांच्या पगाराची खाती Axis बॅंकमध्ये उघडण्यावरून मोठा गदारोळ झाला होता. 2015 मध्ये राज्यात देवेंद्र फडणवीसांचं सरकार होतं. त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस Axis बॅंकेत उच्चपदस्थ अधिकारी असल्याने सरकारने पोलिसांची खाती Axis बॅंकमध्ये उघडण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप काँग्रेसने केला होता.
या प्रकरणावरून राज्यात मोठं राजकारण झालं. आरोप प्रत्यारोप झाले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांनी मात्र हे आरोप फेटाळले होते.
पोलीस दलाने 21 ऑक्टोबरला पोलिसांच्या पगाराबाबत HDFC बॅंकेसोबत करार केला आहे. पोलिसांनी परिपत्र काढून विविध बॅंकांनी प्रस्ताव सादर केले त्यातील सर्वांत उत्तम प्रस्ताव HDFC बॅंकेने दिल्याची माहिती दिली आहे.
बीबीसीला मिळालेल्या माहितीनुसार HDFC बॅंकेच्या ऑफरमध्ये,
- 10 लाखांपर्यंत विमा कवच- नैसर्गिक किंवा कोव्हिड-19 ने मृत्यू झाल्यास
- 90 लाख रूपये अपघातात मृत्यू (डेबिट कार्डच्या वापराशिवाय) अधिक 10 लाख 30 दिवसांच्या आत डेबिट कार्ड वापरल्यानंतर
- कुटुंबीयांसाठी पाच झिरो बॅलन्स खाती (11 लाखाच्या विमा कवचासह)
या गोष्टींचा समावेश आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)