You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2020 : नवी मुंबईने पटकावला देशात तिसरा नंबर
सलग चौथ्या वर्षी इंदौर शहराने स्वच्छ भारत सर्वेक्षणात पहिला क्रमांक पटकावलेला आहे. देशातल्या सर्वात स्वच्छ शहरांच्या यादीत सुरत दुसऱ्या तर नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे.
28 दिवसांच्या कालावधीमध्ये देशातल्या 4242 शहरांमध्ये 'स्वच्छ सर्वेक्षण 2020' करण्यात आलं होतं. या देशव्यापी पाहणीचे निकाल आज जाहीर करण्यात आले. केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी गृहनिर्माण आणि नगरविकास खात्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छ महोत्सवात याविषयीची घोषणा केली.
10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या शहरांमध्ये सलग चौथ्या वर्षी इंदौरने पहिला क्रमांक पटाकवला आहे. सुरत दुसऱ्या आणि नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत नाशिक शहर 11व्या, ठाणे 14व्या, पुणे 15व्या तर नागपूर 18व्या क्रमांकावर आहे.
1 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या देशातल्या शहरांमध्ये महाराष्ट्रातल्या कराडची सर्वात स्वच्छ शहर म्हणून निवड करण्यात आली आहे. याच गटामध्ये सासवड शहर दुसऱ्या क्रमांकावर आहे. आणि लोणावळा शहर तिसऱ्या क्रमांकावर आहे.
स्वच्छतेच्या दृष्टीने देशभरातल्या राज्यांच्या क्रमवारीत छत्तीसगड पहिल्या क्रमांकावर आहे. तर या यादीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. मध्य प्रदेशाताला या विभागात तिसरं स्थान मिळालं आहे.
यासोबतच देशभरात 66 लाखांपेक्षा जास्त घरगुती टॉयलेट्स आणि 6 लाख सार्वजनिक टॉयलेट्स बांधण्यात आल्याचंही या स्वच्छ सर्वेक्षण कार्यक्रमात जाहीर करण्यात आलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)