अभिषेक बच्चन यांची कोरोनावर मात, नानावटीच्या डॉक्टरांचे मानले आभार

फोटो स्रोत, Hoture Images
अमिताभ बच्चन यांच्यानंतर अभिषेक बच्चन यांचीही कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली आहे. अभिषेक बच्चन यांनीच त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती दिली.
"दुपारीच माझी कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली. ही लढाई मी जिंकेन, असं मी म्हटलंच होतं. माझ्यासाठी आणि कुटुंबासाठी तुम्ही केलेल्या प्रार्थनांसाठी धन्यवाद. नानावटी हॉस्पिटलचे डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार. सर्वांचे धन्यवाद," असं ट्वीट अभिषेक बच्चन यांनी केले आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
2 ऑगस्ट 2020 रोजी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले होते. अमिताभ बच्चन यांनी ट्वीट करून आपण कोरोनामुक्त झाल्याचं जाहीर केलं होतं.
आपल्या प्रकृतीसाठी प्रार्थना करणाऱ्या, शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे अमिताभ यांनी आभारही मानले होते.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
अमिताभ यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. आता ते घरी विश्रांती घेतील, असं अभिषेक बच्चन यांनीही सांगितलं होतं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
दरम्यान, ज्यावेळी अमिताभ बच्चन यांना हॉस्पिटलमधून सोडण्यात आलं होतं, त्यावेळी अभिषेक बच्चन हे हॉस्पिटलमध्येच होते. याबद्दल माहिती देताना अभिषेक यांनी म्हटलं होतं की, को-मॉर्बिडिटी असल्याने माझ्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून मला हॉस्पिटलमध्ये थांबावं लागेल.
"तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा, प्रार्थना आणि आशीर्वादामुळे माझी प्रकृती हळूहळू सुधारते आहे. तुमचा ऋणी आहे," असं अभिषेक यांनी म्हटलं होतं.

फोटो स्रोत, ANI
लवकरच कोरोनावर मात करून परतेन असा विश्वास अभिषेक यांनी व्यक्त केला होता आणि आता त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
कोरोना झाल्याची माहिती 11 जुलैला अमिताभ यांनी स्वत:च ट्वीट करून दिली होती. अमिताभ आणि अभिषेक यांना नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 4
दरम्यान, अभिषेक यांच्या पत्नी आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्या यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता. मात्र त्यांना काही दिवसांपूर्वीच हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आलं आहे.
वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)