You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सोनिया गांधी दिल्लीतल्या सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये दाखल
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना आज (30 जुलै) संध्याकाळी 7 वाजता दिल्लीतल्या सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. ANI वृत्तसंस्थेनं ट्वीट करून ही बातमी दिली आहे.
त्यांच्या नियमित तपासण्या करण्यासाठी दाखल करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे. गंगाराम हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. डी. एस. राणा यांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं म्हटलं आहे.
काँग्रेसच्या गोटातून अद्यापही या वृत्ताला दुजोरा देण्यात आलेला नाही.
राहुल गांधी यांनी 3 जुलै 2019 रोजी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या पराभवाची जबाबदारी घेत राहुल अध्यक्षपदावरून पायऊतार झाले होते. त्यानंतर महिन्याहून अधिक काळ काँग्रेसचं राष्ट्रीय अध्यक्षपद रिक्तच होतं.
राहुल गांधी यांनी त्यांच्या अध्यक्षपदाचा राजिनामा दिल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा एकदा सोनिया गांधी यांच्या हाती काँग्रेसची सूत्र आली आहेत.
कोरोनामुळे सुरू झालेल्या लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरित मजुरांच्या मुद्द्यावरून त्यांनी नरेंद्र मोदी सरकारविरोधात आघाडी उघडली होती.
अलीकडच्या काळात महत्त्वाच्या मुद्द्यांवर व्हीडिओ जारी करून त्या त्यांची मतं मांडताना दिसत आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)