चिनी अॅपवर बंदी : आणखी 47 अॅप्सवर भारताकडून निर्बंध

फोटो स्रोत, Getty Images
चीनमध्ये तयार करण्यात आलेल्या 59 मोबाईल अॅप्सवर भारताने काही दिवसांपूर्वी बंदी घातली होती. यातल्या काही अॅप्सची क्लोन कॉपी असलेल्या शेअर इट लाईट, टिकटॉक लाईट, बिगो लाईव्ह लाईट, हॅलो लाईट यांसारख्या 47 अॅप्सवर इलेकट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मंत्रालयाने बंदी घातल्याची माहिती ANI वृत्तसंस्थेनं दिली आहे.
भारत-चीनचे संबंध गलवान खोऱ्यातल्या वादानंतर चांगलेच ताणले गेले आहेत. या वादानंतर लगेचच भारताने चीनमध्ये निर्माण झालेल्या टिकटॉक, कॅमस्कॅनर, हॅलो यांसह 59 अॅप्सवर बंदी घातली होती.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
अॅप्सच्या क्लोन कॉपीही बंद
या अॅप्सच्या माध्यमातून भारतीय ग्राहकांचा डेटा चोरीला जात असल्याचा आरोप केंद्र सरकारने केला होता. त्यानंतर या अॅप्स चालवणाऱ्या कंपन्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधीही देण्यात आली होती.
मात्र, यातल्या बहुतांश अॅप्सची क्लोन कॉपी म्हणजेच त्यासारखंच हुबेहुब दुसरं अॅप सुरूच होतं. अशा 47 अॅप्सवर इलेकट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मंत्रालयाने बंदी घातल्याचं ANI वृत्तसंस्थेनं स्पष्ट केलं आहे.

- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोना व्हायरसची लक्षणं टाळायची असतील तर मास्कचा असा होईल उपयोग

यात टिकटॉक लाईट, हॅलो लाईट, शेअर इट लाईट, बिगोल लाईव्ह लाईट, VFY लाईट या अॅप्सचा समावेश आहे. मूळ अॅप बंद झाल्यानंतर संबंधित कंपन्यांनी त्या अॅपच्या लाईट व्हर्जनमार्फत आपला कारभार सुरूच ठेवला होता.
केंद्र सरकारकडून मात्र अद्याप या बातमीला अधिकृतपणे दुजोरा देण्यात आलेला नाही.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























