You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना : दिल्लीत कोव्हिड सेंटरमध्ये 14 वर्षीय मुलीवर कोरोनाग्रस्तानेच केला लैंगिक अत्याचार
दिल्लीमधल्या कोव्हिड-19 केअर सेंटरमध्ये एका 14 वर्षीय मुलीवर दुसऱ्या एका कोरोनाग्रस्त रुग्णाने लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर घटना उघड झाली आहे.
अत्याचार करणारा तरुण 19 वर्षांचा असून त्याला गुरुवारी अटक करण्यात आली. यावेळी या घटनेचा मोबाईलद्वारे व्हीडिओ काढणाऱ्या दुसऱ्या एका व्यक्तीलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
मुलगी आणि या दोघांनाही कोरोनाची लागण झाल्याने त्यांना कोव्हिड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आलं होतं. दिल्लीतलं हे मोठं सेंटर असून इथे 10 हजार बेड्सची सोय आहे. ही घटना 15 जुलैला घडली असून त्याची माहिती गुरुवारी बाहेर आली.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा- कोरोना झाल्यानंतर बरं व्हायला रुग्णाला किती वेळ लागतो?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्राला पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे दोन्ही आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबद्दल अधिक माहिती देताना वरिष्ठ पोलीस अधिकारी परविंदर सिंग यांनी सांगितलं की, "आरोपींवर गुन्हे दाखल करुन त्यांना न्यायालयात हजर केलं होतं. दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र, दोघांनाही कोरोनाची लागण असल्याने ते पूर्ण बरे होईपर्यंत त्यांना विलगीकरणातच ठेवलं जाईल. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे."
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार, अत्याचाराची घटना कोव्हिड केअर सेंटरमधल्या बाथरुममध्ये घडल्याचं समजतं आहे. मुलीने घडलेली गोष्ट पालकांना सांगितल्यावर पालकांनी हे त्या सेंटरच्या प्रशासनाच्या लक्षात आणून दिलं आहे.
10 हजार बेड्सचं हे सेंटर जगातलं एक मोठं सेंटर ठरावं या उद्देशाने बांधलं गेलं. सौम्य लक्षणं किंवा अजिबात लक्षणं नसलेल्या रुग्णांना इथे ठेवलं जातं. अशा कोव्हिड केअर सेंटर्समध्ये लैंगिक अत्याचाराच्या घटना भारतात यापूर्वीही घडल्या आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)