CBSE 12th 2020 : दिव्यांशी जैनला मिळाले 600 पैकी 600 मार्क

फोटो स्रोत, BBC hindi
CBSE बोर्डच्या यंदाच्या 12 वीच्या परिक्षेत लखनऊमध्ये राहणाऱ्या दिव्यांशी जैन या विद्यार्थिनीने चांगलं यश मिळवत 600 पैकी 600 गुण मिळवले आहेत. 100 टक्के गुण मिळवणाऱ्या 18 वर्षीय दिव्यांशीचं त्यामुळे देशभरातून कौतुक होत आहे.
मला या यशामुळे धक्का बसला असून हे माझ्यासाठी अनपेक्षित होतं, अशी प्रतिक्रिया दिव्यांशीने माध्यमांकडे व्यक्त केली. लखनऊमधल्या नवयुग रेडीयंस सिनियर सेकंडरी स्कूलची असलेल्या दिव्यांशीने इंग्रजी, संस्कृत, इतिहास, भूगोल, इंशुरन्स आणि अर्थशास्त्र या सहाही विषयांमध्ये 100 पैकी 100 गुण मिळवले.
यातल्या भूगोल विषयाची परिक्षा तिने कोव्हिड-19 मुळे दिलेली नव्हती. कोव्हिडमुळे हा पेपर रद्द करण्यात आला होता. याचे गुण प्रत्येक विद्यार्थ्याला देण्यात आलेत.

- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?

दिव्यांशी सांगते की, "मी माझ्या यशाचं संपूर्ण श्रेय हे माझ्या पालकांना आणि शिक्षकांना देते. माझ्या शिक्षकांनी मला मार्गदर्शन केलं आणि त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे मी अभ्यास केला. हा अभ्यास करताना वेळापत्रक पाळण्यासाठी माझ्या पालकांनी मला मदत केली. यामुळेच अभ्यासावर मला लक्ष केंद्रीत करता आलं. तसंच मी सरावासाठी अनेक चाचण्या आणि पेपर पुन्हा - पुन्हा सोडवले. मी गाईडचा अजिबात वापर केला नाही. तसंच, मी संपूर्ण वर्षभर अभ्यास केला. त्याचा सुद्धा मला फायदा झाला. इथून पुढे इतिहास हा विषय घेऊन शिकणार आहे."
दिव्यांशी असं यश मिळवेल याची खात्री असल्याचं तिच्या शाळेचे मुख्याध्यामपक बी. सिंग यांनी सांगितलं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)




















