You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दिल बेचारा : सुशांत सिंह राजपूतच्या चित्रपटाचा ट्रेलर रीलिज, सोशल मीडियावर भावूक पोस्ट
सुशांत सिंह राजपूतच्या दिल बेचारा या चित्रपटाचा ट्रेलर सोमवारी दुपारी 4 वाजता लाँच करण्यात आलं आहे. त्यानंतर सोशल मीडियावर #DilBecharaTrailer मोठ्या प्रमाणावर ट्रेंड होत आहे.
ट्रेलरचा व्हीडिओ यूट्यूबवर प्रसिद्ध झाल्यावर एका यूझरनं या ट्रेलरमधीलच एक वाक्य कमेंट करत लिहिलं आहे.
"जन्माला कधी यायचं किंवा मरायचं कधी, हे आपण ठरवू शकत नाही. पण, जगायचं कसं, ते मात्र आपण ठरवू शकतो."
'फॉल्ट इन आवर स्टार्स' या हॉलिवूडपटाचा हा ऑफिशियल रिमेक आहे. या चित्रपटाला ए. आर. रेहमानने म्युझिक दिलं आहे.
सोशल मीडियावर ट्रेंड
या चित्रपटातील अभिनेत्री संजना संघीनं ट्वीट केलं आहे की, "दिल बेचारा चित्रपटाचं ट्रेलरमुळे माझ्या पोटात खदखद होईल, असं कुणीही मला सांगितलं नव्हतं. तुम्ही सगळे आमच्यासोबत असाल, असा मला विश्वास आहे. तोसुद्धा आपल्यासोबत आहे."
तिनं पुढे म्हटलंय, तो ज्यानं तिला आधार दिला, तो ज्यानं तिचं दु:ख दूर केलं. तिला प्रत्येक क्षण महत्त्वाचं असल्याचं शिकवलं, असंही तिनं म्हटलं आहे.
रोहिल जयस्वाल यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, "माझ्या घरात एकूण 8 मोबाईल फोन आहेत आणि मी त्या सगळ्या फोनवर दिल बेचारा चित्रपटाचा ट्रेलर लावणार आहे. चला, या चित्रपटाला रेकॉर्ड ब्रेड हिट ठरवूया..."
"दिल बेचाराचं ट्रेलर बघताना माझ्या डोळ्यात पाणी आलं. सुशांत तू नेहमीच आमच्या हृदयात राहशील," असं ट्वीट अनिल यांनी केलं आहे.
अमन यांनी ट्वीट करत म्हटलंय की, दिल बेचाराचा ट्रेलर उत्तम आहे. सुशांत आपल्यात नाही, असं वाटतंच नाही.
रचना सहगल यांनी ट्वीट केलं आहे की, सुशांत, तुझी पवित्र रिश्ता ही मालिका मी माझ्या आजीसोबत दररोज बघायचे. तेव्हापासूनच मी तुझी फॅन झाली आहे. मला खात्री आहे की आमच्या सगळ्यांसोबत तूसुद्धा हे ट्रेलर बघत असशील.
- वाचा - महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 4.0 मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?
अंकुर राय भूमिकर यांनी ट्वीट केलं की, सुशांत, तू मला परत हवा आहे. तू किती चांगला होता, ते मला सगळ्यांना सांगायचं आहे. मला ट्रेलर किती आवडला, ते तुला सांगायचं आहे. तुझं हास्य किती सुंदर आहे, हे मला तुला सांगायचं आहे. बस तू मला परत हवा आहे.
हा ट्रेलर पाहिल्यानंतर सुशांतनं आत्महत्या केली, यावर माझा विश्वासच बसत नाहीये, असं अंशुमन मिश्रा यांनी ट्वीट केलं आहे.
14 जून रोजी सुशांत सिंह राजपूतने आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली होती. डिटेक्टिव्ह व्योमकेश बक्शी, एम. एस. धोनी, काय पो चे, सोनचिडिया या चित्रपटातील भूमिकांना प्रेक्षक आणि समीक्षकांची दाद मिळाली होती.
सुशांत सिंह राजपूतने आपल्या करिअरची सुरुवात टीव्हीपासून केली होती. पवित्र रिश्ता या सिरियलमुळे सुशांत सिंह घराघरात पोहोचला होता.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)