NLC स्फोट: तामिळनाडूच्या नेयवेली औष्णिक विद्युत प्रकल्पात मोठा स्फोट, 6 जण मृत्यूमुखी

नेयवेली

फोटो स्रोत, ANI

Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

तामिळनाडूमधल्या एका औष्णिक विद्युत प्रकल्पात झालेल्या अपघातात किमान सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

कड्डलोर जिल्ह्यातील नेयवेली औष्णिक विद्युत प्रकल्पाच्या बॉईलरमध्ये झालेल्या एका स्फोटात कमीत कमी 17 जणांना गंभीर दुखापतही झाली आहे. जखमींवर नेयवेली शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले असून त्यांना पुढच्या उपचारांसाठी चेन्नईला पाठवण्यात आले.

अग्निशमन दलाकडून घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. 5 व्या युनिटमध्ये झालेल्या या अपघातामुळे इथली वीजनिर्मिती काही काळासाठी थांबवण्यात आली आहे.

நெய்வேலி அனல் மின் நிலைய விபத்து

नेयवेली औष्णिक विद्युत प्रकल्पात गेल्या दोन महिन्यात हा तिसरा अपघात आहे. 7 मे रोजी इथल्याच 6 व्या युनिटमध्ये लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला होता.

நெய்வேலி அனல்மின் நிலைய விபத்து
फोटो कॅप्शन, நெய்வேலி அனல்மின் நிலைய விபத்து

दरम्यान, मृतदेह या परिसरातून बाहेर नेण्यावरून इथले कामगार अधिकाऱ्यांविरोधात निदर्शनं करत आहेत. त्यामुळे घटनास्थळी तणाव कायम आहे. नेयवेली पोलीस तसंच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे सैनिक मोठ्या प्रमाणावर परिसरात तैनात करण्यात आले आहेत.

(ही बातमी सतत अपडेट होत आहे.)

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)