You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना संसर्गाचं सावट दहीहंडीवर, उत्सव रद्द करण्याबाबत समन्वय समिती ठाम
कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असल्यामुळे दहीहंडीचा उत्सव रद्द करण्याची विनंती दहीहंडी समन्वय समितीकडून करण्यात आली आहे.
दहीहंडीचा उत्सव कसा साजरा करता येईल, यासंबंधी गुरूवारी (25 जून) दहीहंडी समन्वय समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीसंबंधी माहिती देताना समितीचे उपाध्यक्ष कमलेश भोईर यांनी सांगितलं, "कोरोनाच्या संकटामुळे सगळेच सण यावर्षी रद्द होत आहेत. त्यामुळे दहीहंडी कशी खेळणार हा प्रश्न आमच्यासमोर होता. सामाजिक अंतर ठेवून दहीहंडी कशी साजरा होणार, हा प्रश्न होता. आम्ही सगळ्या दहीहंडी मंडळांना कळकळीची विनंती केली की, यावर्षीचा श्रीकृष्ण जन्मोत्सव हा साध्या पद्धतीनं साजरा करूया आणि गोपाळकाला जवळजवळ रद्द करावा."
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
कोणतीही लस आणि ठोस औषध उपाय नसताना आपण एकत्र येण्याची जबाबदारी घेणार तरी कसे, असा प्रश्न समन्वय समितीच्या ठरावात उपस्थित करण्यात आला आहे.
जिम, सलून चालू करणार - अस्लम शेख
मुंबईत जिम आणि सलून या आठवड्यात चालू होणार, अशी माहिती वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
ते म्हणाले, "मुंबईत जिम आणि सलून चालू करा, अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. कारण ल़ॉकडाऊनमुळे सलून बंद असल्यामुळे अनेकांना आर्थिक चिंता सतावत होते. एकानं तर आत्महत्याही केली होती. अनेकांचे केस वाढल्यामुळे त्यांनाही त्याचा त्रास होत आहे. या आठवड्यात सलून आणि जिमवरती नक्कीच चालू करण्यात येईल."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)