You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सीबीएसई (CBSE), आयसीएसई (ICSE) नं 10 आणि 12 वीच्या परीक्षा रद्द केल्या
CBSE 10 वी आणि 12 वीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ही परीक्षा 1 ते 15 जुलै दरम्यान होणार होती. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी गुरुवारी (25 जून) सर्वोच्च न्यायालयात ही माहिती दिली.
दिल्ली, महाराष्ट्र आणि तामिळनाडूसारख्या राज्यांनी परीक्षा घेणं शक्य नसल्याचं स्पष्ट केलं असल्याचं त्यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितलं.
गुरूवारी (25 जून) सर्वोच्च न्यायालयात 12 वीची प्रस्तावित परीक्षा स्थगित करण्यासंबंधीच्या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी तुषार मेहतांनी सांगितलं, की बोर्डानं या परीक्षा रद्द केल्या आहेत.
यासंबंधी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकाकर्त्यांचे वकील ऋषी मल्होत्रा सर्वोच्च न्यायलयात तीन न्यायाधीशांच्या पीठासमोर उपस्थित झाले. जस्टिस एएम खानविलकर या पीठाचे अध्यक्ष होते.
ऋषी मल्होत्रांनी कोर्टासमोर सांगितलं, की महाराष्ट्र, दिल्ली आणि ओडिशानं कोरोनामुळे परीक्षा घेण्यात असमर्थता दर्शवली आहे.
सर्वोच्च न्यायालयानं जेव्हा सॉलिसिटर जनरलना विचारलं, की बोर्ड 12 वीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे मार्क देणार आहे की नंतर परीक्षा देण्याचा पर्याय देणार आहे. त्यावर सॉलिसिटर जनरल मेहतांनी होकार दिला आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांकडे हे पर्याय असतील.
ICSE नंसुद्धा आपल्या 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. मात्र CBSE प्रमाणे त्यांनीही नंतर परीक्षा देण्याचा पर्याय दिला नाहीये.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)