निसर्ग चक्रीवादळ : रायगड जिल्ह्याला 100 कोटी रुपयांची मदत, उद्धव ठाकरेंची घोषणा

Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

'निसर्ग' चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील काही भागात नुकसान झालं आहे. या नुकसानग्रस्त भागाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 5 जूनला पाहणी केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत रायगड जिल्ह्याला तातडीनं 100 कोटी रुपयांची मदत जाहीर केली.

उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत मांडलेले मुद्दे -

  • रायगड जिल्ह्य़ासाठी 100 कोटी रुपये जाहीर करण्यात येत आहे.
  • इतर जिल्ह्यांमध्ये त्या त्या प्रमाणात काळजी घेण्यात येईल.
  • प्रशासन प्राध्यान्यक्रमानं काम करत आहे. वीजपुरवठा खंडित केला जात आहे.
  • त्यासाठी बाहेरून टीम द्यायचा विचार करत आहोत.
  • नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. लोकांना फोटो पाठवण्यास सांगितलं आहे. लवकरच मदत देण्यात येईल.
  • ज्यांच्या घरांची पडझड झाली आहे, त्याविषयी माहिती घेऊन मदत दिली जाईल. कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही.

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी गुरुवारी रायगड जिल्ह्याचा दौरा करून निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला.

विजेचे पडलेले खांब आणि तुटलेल्या तारांच्या दुरुस्तीचे काम तात्काळ पूर्ण करून जिल्ह्यातील वीजपुरवठा सुरळीत सुरू करण्याचे निर्देश त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)