You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उद्धव ठाकरे देशातले पाचव्या क्रमांकाचे लोकप्रिय मुख्यमंत्री - सर्व्हे #5मोठ्या बातम्या
विविध वृत्तपत्रं आणि वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या
1. देशातल्या सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे
सी-व्होटर संस्थेने देशातल्या नेत्यांच्या लोकप्रियतेविषयीची एक पाहणी केली. यामध्ये लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये उद्धव ठाकरे पाचव्या क्रमांकावर आहेत. या अहवालानुसार उद्धव ठाकरेंची लोकप्रियता 76.53% आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यापेक्षा उद्धव ठाकरेंची लोकप्रियता जास्त आहे. महाराष्ट्र टाईम्समध्ये याविषयीचं वृत्त आहे.
- वाचा - महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 4.0 मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक हे यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. दुसऱ्या क्रमांकावर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल तर तिसऱ्या क्रमांकावर केरळचे मुख्यमंत्री पिनारायी वियजन आहेत. चौथ्या क्रमांकावर आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी आहेत. अशोक गेहलोत, ममता बॅनर्जी, योगी आदित्यनाथ या नेत्यांनाही त्यांनी मागे टाकल्याचं सी-व्होटरने म्हटलं आहे.
2. विजय मल्ल्यांना मुंबईत आणणार
फरार मद्यसम्राट विजय मल्ल्या बुधवारी रात्री मुंबईत दाखल होण्याचा अंदाज तपास यंत्रणांनी व्यक्त केला होता. मुंबईत दाखल झाल्यानंतर मल्ल्यांना काही काळ सीबीआयच्या कार्यालयात ठेवण्यात येईल आणि नंतर न्यायालयात हजर केलं जाईल. युके कोर्टाने 14 मे रोजी मल्ल्यांच्या प्रत्यार्पणावर शिक्कामोर्तब केलं होतं. लोकमतने याविषयीची बातमी छापलीय.
विजय मल्ल्यांना आर्थर रोड तुरुंगाच्या परिसरातल्या दोन मजली इमारतीत ठेवण्यात येणार असून यासाठी पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे.
3. मध्य आणि पश्चिम रेल्वेचे विलगीकरण डबे वापराविना
कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता मध्य आणि पश्चिम रेल्वेने गाड्यांच्या डब्यांमध्ये विलगीकरण कक्ष तयार केले. पण या डब्यांचा अजूनही वापर न करण्यात आल्याने ते पडून आहेत. या प्रत्येक डब्यात 16 बेड्स, वैद्यकीय उपकरणं, रक्त पुरवठा, व्हेंटिलेटर, प्रसाधगृह अशी सज्जता आहे. लोकसत्तामध्ये याविषयीची बातमी आहे.
मुंबईतल्या पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या 400 पेक्षा जास्त डब्यांचं रूपांतर विलगीकरण केंद्रांमध्ये करण्यात आलेलं आहे.
4. हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनच्या चाचण्या सुरू होणार
कोरोना व्हायरसवरच्या उपचारांविषयी हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनच्या क्लिनिकल ट्रायल्स पुन्हा सुरू होणार असल्याचं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने म्हटलंय. या चाचण्या WHO ने 25 मे रोजी स्थगित केल्या होत्या. NDTV ने याविषयीची बातमी दिलीय.
जगभरातल्या 35 देशांमधल्या 3500 पेक्षा जास्त रुग्णांवर या हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनची चाचणी करण्यात येणार आहे.
5. APMC कायद्यात बदल, देशभरात शेतमाल कुठेही विकता येणार
शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या 2 कॅबिनेट निर्णयांना मंजुरी देण्यात आलीय. यानुसार आता शेतकऱ्याला देशभरात कुठेही शेतमाल विकण्याची मुभा असेल. तर जीवनावश्यक वस्तूंच्या कायद्यातून शेतमालाच्या किंमतीवरचं सरकारी नियंत्रणही हटण्यात आलेलं आहे. एबीपी माझाने याविषयीची बातमी दिलीय.
डाळी, तेल, कांदे - बटाटे या गोष्टींना आता जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून हटवण्यात आलंय. या वस्तूंच्या साठ्यावर आणि किंमतींवर आता सरकारचं नियंत्रण नसेल. बाजारतल्या मागणीनुसार शेतकऱ्याला त्याच्या उत्पादनाचा फायदा घेता येईल.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)