कोरोना व्हायरस : वांद्रे गर्दीप्रकरणी उत्तर भारतीय संघटना अध्यक्ष विनय दुबे ताब्यात #5मोठ्या बातम्या

फोटो स्रोत, Getty Images
आज सकाळी विविधं वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1. वांद्रे गर्दीप्रकरणी उत्तर भारतीय संघटना अध्यक्ष विनय दुबे ताब्यात
मुंबईतील वांद्रे स्टेशनवर मंगळवारी (14 एप्रिल) लोकांची मोठी गर्दी झाली होती. लॉकडाऊनच्या काळात जमा झालेल्या या गर्दी प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत उत्तर भारतीय संघटना अध्यक्ष विनय दुबे याला ताब्यात घेतलं आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
विनय दुबे याला ऐरोली येथून नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले असून मुंबई पोलिसांकडे हस्तांतरित केले आहे. विनय दुबे याने फेसबुकवर आंदोलनाची हाक दिली होती. उत्तर भारतात राहणाऱ्या व कामासाठी मुंबईत आलेल्या मजुरांना आपआपल्या राज्यात पाठवण्यासाठी आंदोलन छेडणे, 18 तारखेला एकत्र जमण्याचे आवाहन करणे इत्यादी आरोप त्याच्यावर ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. अफवा पसरवणे, संचारबंदीचे उल्लंघन करणे, नागरिकांना एकत्र जमवणे आणि अन्य कलमान्वये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
या बाबत अधिक माहिती देताना उपायुक्त पंकज डहाणे यांनी सांगितले, की दुबे याच्याबाबत माहिती मिळताच त्याला ताब्यात घेण्यात आले. विनय दुबे सध्या आझाद मैदान पोलिसांच्या ताब्यात आहे.
2. 10 लाख व्यक्तींमागे केवळ 149 किट्स
देशात कोरोना विषाणुच्या आवश्यक त्या प्रमाणात चाचण्याच होत नसल्याचा दावा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केला आहे. देशात 10 लाख लोकांमागे केवळ 149 डायग्नोस्टिक किट्स असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठीनं ही बातमी दिली आहे.
कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जास्तीत जास्त चाचण्या होणं गरजेचं आहे. मात्र भारतात चाचण्यांचं प्रमाण खूप कमी असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
ट्विटच्या माध्यमातून त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. आपल्या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं आहे, की समुहाची तपासणी करणे हेच कोरोनाविरोधातील लढ्यातील प्रमुख अस्त्र आहे. पण सध्याच्या घडीला आपण खूप मागे आहोत.
3. गोवा लवकरच कोरोनामुक्त होणार-मुख्यमंत्री प्रमोद सावंत
महाराष्ट्रात कोरोनाचं संकट गहिरं होत असताना गोव्यात मात्र कोरोनाचा प्रादूर्भाव आटोक्यात आल्याचं चित्र सध्या तरी दिसत आहे. गोव्यात 17 एप्रिलपर्यंत एकही नवीन रुग्ण आढळला नाही तर गोवा 'ग्रीन झोन' म्हणून घोषित होईल, असं गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटलं आहे. इकॉनॉमिक टाइम्सनं ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

- वाचा- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
- वाचा - कोरोनाच्या तडाख्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अजूनच संकटात?

गोव्यात गेल्या 11 दिवसांपासून एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही. पुढचे काही दिवस अशीच परिस्थिती राहिली तर गोवा कोरोनामुक्त म्हणून घोषित करता येईल. गोव्यात आतापर्यंत सात कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे. हे सगळे रुग्ण उत्तर गोवा जिल्ह्यातले आहे. यापैकी पाच रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर उर्वरित दोन रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र, 4 एप्रिलपासून गोव्यात एकही नवीन कोरोनारुग्ण आढळलेला नाही.
4. गुजरातमध्ये 'हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन'ची मोठ्या प्रमाणावर खरेदी
कोरोना विषाणूवर उपाय म्हणून अमेरिकेने भारताकडून 'हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन' या औषधाची मागणी केल्यानंतर आता गुजरातमध्येही या औषधाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सर्वसामान्य नागरिक या औषधाची मोठ्या प्रमाणावर खरेदी करत असल्याचं वृत्त 'द इंडियन एक्सप्रेस'नं दिलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
गुजरात अन्न व औषध प्राधिकरणाचे आयुक्त एच. जी. कोशिया यांनी सांगितलं, की काही लोक तर या औषधाचा साठा करून ठेवत आहेत. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या औषधाचं सेवन शरीरासाठी घातक ठरू शकतं. गुजरातमध्ये आता या औषधाच्या खरेदी विक्रीची नोंद ठेवण्यास सांगण्यात आलं आहे. औषधाची साठेवाजी केल्यास बाजारात त्याची टंचाई निर्माण होऊ शकते.
5. कबड्डीपटू काशलिंगला अटक
आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धा आणि प्रो-कबड्डीत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारा कबड्डीपटू काशिलिंग अडके याला पोलिसांनी अटक केली आहे. सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातल्या कासेगाव या गावात घरीच जुगार अड्डा आणि दारुअड्डा चालवत असल्याप्रकरणात त्याला अटक झाली आहे. इतर आठ जणांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
लोकसत्ताने ही बातमी दिली आहे. काशलिंगने प्रो-कबड्डीमध्ये अगदी थोड्या काळात नाव कमावलं होतं. दिल्लीकडून खेळताना त्याला सर्वोत्तम चढाईपटूचा खिताबही मिळाला होता. मात्र, गेल्या हंगामात कुठल्याच संघाने त्याला घेतलं नाही. त्यातच तो व्यसनाच्या आहारी गेला. त्याला पेट्रोलियम कंपनीतली नोकरीही सोडावी लागली. यानतंर त्याने स्वतःच्या घरातच जुगारअड्डा सुरू केला, अशी माहिती पोलिसांनी दिल्याचं लोकसत्ताच्या वृत्तात म्हटलं आहे.
हेही नक्की वाचा -
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)























